गोसे धरणावर होणार मत्स्य उद्योगाची निर्मीती !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला भविष्यात जागतिक स्तरावर स्थान मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे.या करिता गोसे धरणावर भव्य मत्स्य प्रकल्प उभारण्याची हमी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज आम. नरेंद्र भोंडेकर यांना दिली. ज्या करिता भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील मत्स्य सोसायट्यांना एकत्रित आणून मोठे संघ स्थापित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. इतकेच नाही तर या दुष्काळ परीस्थितीत मत्स्य व्यावसायिकांना कर्जमाफी, नि:शुल्क मत्स्यबीजासह भंडाºयाला लागून भव्य मच्छी मार्केट उभारण्याचे आश्वासन सुद्धा मंत्री महोदयांनी यावेळी दिले. भंडारा जिल्हा हा वैनगंगेच्या तीरावर वसलेला असून हा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो.

जिल्ह्यात मत्स्य व्यवसायावर उपजीविका चालविणारे हजारो कुटूंब असून यावर आधारित संस्था सुद्धा आहेत. त्यांच्यासाठी भंडाºयात मोठा मत्स्य उद्योग उभारता येऊ शकतो अशी संकल्पना आम. नरेंद्र भोंडेकर यांना आली आणि त्यांनी राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री राणे यांना एक पत्राद्वारे बैठक लावण्याची विनंती केली. यावर मंत्री महोदयांनी आज बैठकीचे आयोजन केले.ज्यात आम. भोंडेकर यांनी भंडारा जिल्ह्यातील मात्सोद्योग आणि झिंगे यांचे महत्व पटवून देत याची मागणी जागतिक स्तरावर होण्याची शक्यता वर्तविली. ज्यावर मंत्री महोदयांनी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सोसायटींना एकत्र आणून संघ उभारण्याचे निर्देश दिले आणि या संघाच्या मार्फत गोसेच्या तीरावर मोठे उद्योग उभारण्याचे आश्वासन दिले.

या उद्योगाच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने फिशिंग करून त्याची पॅकेजिंग सह जागतिक स्तरापर्यंत निर्यात सुद्धा करता येईल. आम. भोंडेकर यांच्या या संकल्पनेतून भंडारा जिल्ह्यातील १०हजारांपेक्षा अधिक मात्स्य व्यवसायीकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असुन सोबतच याचा लाभ पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गढचिरोली, वर्धा व नागपूर या जिल्ह्यातील मत्स्य व्यावसायिकांना सुद्धा होणार आहे. या वेळी मत्स्य व्यवसाय आयुक्तांना या उद्योगाचे डीपीआर तयार करून तत्काळ शासन दरबारी पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासोबतच आम. भोंडेकर यांनी भंडारा जिल्ह्यात मत्स्यपालन केंद्र आणि एकलव्य स्मारक तयार करण्याची मागणी सुद्धा यावेळी ठेवली.या बैठकीत मत्स्य व्यवसाय आयुक्त मुंबई, सह आयुक्त नागपूर सह भंडारा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर बैठकीत उपस्थित होते.

administrator1

administrator1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *