हजारो दिव्यांनी उजळली पवनीची वैनगंगा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : त्रिपुरारी पौर्णिमेच्या पावन पर्वावर ऐतिहासिक पवनी नगरीतील वैनगंगा नदीचे पात्र हजारो दिव्यांच्या मंद प्रकाशाने उजळून निघाले. रात्रीच्या निरव शांततेत वैनगंगेच्या संथ प्रवाहावर तरंगणाºया या दीपमाळांचे विलोभनीय दृश्य पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. पवनी येथील वैनगंगा तीरावर त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त दीपदान करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जात आहे. यंदाही या परंपरेला उजाळा देत संध्याकाळ पासूनच नदीच्या घाटावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आबालवृद्धांसह महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विधिवत पूजाअर्चा करत वैनगंगेच्या पात्रात दीपदान केले.

संथवाटाव्या अशा अत्यंत मंदगतीने वाहणाºया निळयाशार पाण्यावर जणू आकाशातील चांदण्याच अवतरल्या आहेत, असा भास निर्माण करणारा हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. नदीच्या पायºयांवर बसून हा नयनरम्य दीपोत्सव डोळ्यांत साठवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दिव्यांच्या तेजोमय प्रकाशाने संपूर्ण घाट परिसर उजळून निघाला होता. दिव्यांच्या माळा लावल्यागत वैनगंगेचे पात्र सजले होते. एकीकडे दिव्यांचा मदत प्रकाश अन् दूसरीकडे फटाक्यांची आतिषबाजी असे आनंदाचे उधळण करणारे चित्र वैनगंगेच्या काठी पौर्णिमेच्या चांदण्यात पडले होते. पवनी येथे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेने पवनीच्या वैभवात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला असून, या सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे. वैनगंगेचे हे लोभस रुप पाहण्यासाठी परगावातीलही अनेकांनी गर्दी केली होती, हे विशेष!

administrator1

administrator1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *