जिओ टॉवरमधील कॉपर केबल चोरीचा पर्दाफाश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथील रिलायन्स जिओ कंपनीच्या मोबाइल टॉवरमधून कॉपर पॉवर केबल चोरी करणाºया आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सुरेंद्र चौधरी रा. डव्वा याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून चोरीची दोन नग कॉपर पॉवर केबल, असा एकूण २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. डव्वा येथील रिलायन्स जिओ कंपनीच्या मोबाइल टॉवरमधून २९ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० ते रात्री ८ वाजताच्या दरम्यान सुमारे २० फूट लांबीची दोन कोर कॉपर केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या प्रकरणी डुग्गीपार पोलिस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, २४ नोव्हेंबर रोजी डुग्गीपार पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तांत्रिक माहिती व गोपनीय खबºयामार्फत चोरीत डव्वा येथील सुरेंद्र चौधरी याचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने जिओ टॉवरमधून कॉपर पॉवर केबल चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेला केबल घरात लपवून ठेवल्याचेही त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरातून काळ्या रंगाच्या दोन नग दोन कोर कॉपर पॉवर केबल पंचांसमक्ष जप्त केल्या. जप्त मुद्देमालाची किंमत २० हजार रुपये आहे.

administrator1

administrator1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *