भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : भारतीय जनता पार्टी पवनी शहर व तालुका यांच्या वतीने आयोजित दिवाळी स्नेहमिलन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पक्षातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आणि हितचिंतकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार तथा भाजपाचे प्रदेश सचिव डॉ. परिणय फुके, भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे आमदार अविनाश ब्राह्मणकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आशु गोंडाने, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष माहेश्वरी नेवारे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेंद्र फुलबांधे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज जिभकाटे, पवनी तालुकाध्यक्ष तिलक वैद्य, पवनी शहराध्यक्ष संदीप नंदरधने, सोनू बावनकर, अड्याळ मंडळ अध्यक्ष प्रकाश कुर्जेकर, नगरसेवक विलास काटेखाये आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार परिणय फुके, आमदार अविनाश ब्राह्मणकर, जिल्हाध्यक्ष आशुभाऊ गोंडाने यांच्यासह मान्यवरांनी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पक्ष संघटनेतील एकजूट, परस्पर समन्वय आणि कार्यकर्त्यांमधील स्नेह अधिक दृढ करण्यासाठी अशा स्नेहमिलन सोहळ्यांचे महत्त्व असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. दिवाळी हा प्रकाश, आनंद आणि नवचैतन्याचा सण असून प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी व आनंद नांदो, अशी सदिच्छाही व्यक्त करण्यात आली. या सोहळ्यात तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील काही शेतकºयांचा सन्मान करण्यात आला. तसेच पवनी शहरातील नवविदर्भ क्रीडा मंडळाचा खेळाडू कुमार सोहम लांजेवार याची गुजरातमधील बडोदरा येथे होणाºया ४५ व्या ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला महिला मोर्चाच्या अध्यक्षा सीमा पडोळे, कांचन खडगी, पल्लवी समरीत, युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहित नागपुरे, पियुष फुलबांधे यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील शक्तिकेंद्रप्रमुख, बूथप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवनी तालुकाध्यक्ष तिलक वैद्य यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन नगरपरिषद पवनीचे गटनेते सुरेश अवसरे यांनी केले.
