ग्रीनफ्रेंड्सच्या विसर्जन कुंडाला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे मागील १० वर्षांपासून तलाव नदी नाले प्रदूषणविरहित राहण्याच्या दृष्टीने निर्माल्य संकलन मोहीम ग्रीनफ्रेंड्सच्या निर्माल्य कलशात सर्व लाखनी, सावरी व मानेगाव येथील सार्वजनिक गणेश मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे केले गेले असून तसेच गणेशोत्सव मधील घरगुती गणेशाच्या मूतीर्चे विसर्जनास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ग्रीनफ्रेंड्सच्या कृत्रिम गणेश विसर्जन कुंडात गणेश मूर्तीचे विसर्जन केले. ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबच्या निर्माल्यकलशात निर्माल्य जमा करण्याच्या उपक्रमात लाखोरी रोडवरील नवयुवक गणेश मंडळ, संजयनगर येथील बालगणेश मंडळ, बाजार वार्डातील गणेश मंदिर, बाजारातील ‘लाखनीचा राजा’ गणेश मंडळ, बाल गणेश युवा मंडळ सावरी, विक्रम रोडे यांच्या श्री गणेश मंडळ प्रभाग क्रमांक ८, बाल नवयुवक गणेश मंडळ सेलोटी रोड, सिद्धिविनायक गणेश मंडळ, नगरसेवक संदीप भांडारकर यांच्या वार्डातील श्रीदत्त गणेश उत्सव मंडळ, मानेगाव येथील तलावाजवळील गणेश मंडळ तसेच मानेगाव बेळा येथील मठाजवळचा गणेश मंडळ इत्यादी ११ गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांनी ग्रीनफ्रेंड्सची निर्माल्य संकलन चमू प्रथम चोले, पियुष मेश्राम, अभिषेक भाजीपाले, मुरलीधर नान्हे, निसर्गमित्र सलाम बेग व ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा अशोक गायधने यांच्या चमूकडे सुपुर्द केले.

या उपक्रमास गुरुकुल आय टि आय, मानव सेवा मंडळअखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा लाखनी जिल्हा शाखा भंडारा, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था (नेफडो) जिल्हा भंडारा, सिद्धिविनायक हॉस्पिटल लाखनी यांचा सहकार्य लाभले. ग्रीनफ्रेंड्सच्या कार्यालयात कृत्रिम विसर्जन कुंडामध्ये सातव्या दिवशी पोलीस स्टेशनचा गणपती वाजतगाजत मिरवणुकीद्वारे आल्यावर ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य, निसर्गमित्र पंकज भिवगडे, निसर्गमित्र मयुरगायधने यांनी पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे, उपनिरीक्षक शिंदे, तसेच २० पोलीस कर्मचारी यांचे स्वागत वृक्षभेट देऊन करण्यात आले. अंकुर गिºहेपुंजे लाखोरी रोड यांचेकडील गणपती तसेच दहाव्या दिवशी गुरुकुल आय टी आय येथील प्राचार्य खुशालचंद मेश्राम यांचे मार्गदर्शनात वाजत गाजत आलेली मिरवणूक यावेळी गणेशभक्तांना ग्रीनफ्रेंड्स तर्फे ‘विसर्जन कुंड व निर्माल्य संकलनाचे’ महत्व समजावून देण्यात आले त्याचबरोबर लाखोरी रोडवरील रामकृष्ण गिºहेपुंजे, प्रकाश गभने, दत्त मंदिर सार्वजनिक गणेश मंडळातील व परिसरातील नागरिकांच्या ४ घरगुती लहान मूतीर्चे विसर्जन नगरसेवक संदीप भांडारकर यांचे प्रमुख मार्गदर्शनात विसर्जन करण्यात आले.

सोबतच रमेश गभने, दिपक सुनने व मेमन हाल जवळ राहणारे एम एस इ बी पोहरा इथे कार्यरत वांढरे साहेब इत्यादींच्या गणेशमूर्तीचे विसर्जन केले तसेच निर्माल्य दान करून तलावाचे प्रदूषण टाळले त्याबद्दल ग्रीनफ्रेंड्सतर्फे प्रत्येकाना ‘वृक्षभेट’ अशोक वैद्य, मंगल खांडेकर, दिलीप भैसारे, पंकज भिवगडे, सलाम बेग, मयुर गायधने, विवेक बावनकुळे यांचे हस्ते देण्यात आले. गणेशमूर्तीची जमा झालेली माती व निर्माल्य एकत्रित पवित्र असा निर्माल्य खत दरवर्षीप्रमाणे तयार करण्यात येणार आहे असे ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांनी यावेळी सांगितले. २०१४ ला ग्रीनफ्रेंड्सच्या निर्माल्य संकलन प्रकल्पास गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पुणे इथे राज्यस्तरिय द्वितीय क्रमांकाचा १०००० रुपयांचा “सृष्टीमित्र अवॉर्ड” प्राप्त झाला, याची आठवण त्यांनी ह्यावेळी सर्वांना करून दिली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.