रक्तदान शिबीरात १५३ जणांचे रक्तदान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा पवनी तालुका आणि शहराच्या वतीने भव्य रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १५३ रक्तदात्यांनी रक्तदान करीत आहुत्या टाकल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्याचा भाग म्हणून जिल्हाभर रक्तदान महायज्ञाचे आयोजन भाजपच्या वतीने करण्यात आले होते. पवनी तालुका, शहर आणि भारतीय जनता युवा मोर्चाने पवनी येथील भंगाराम देवी मंदिर परिसरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यापुर्वी हवन करून पंतप्रधानांच्या दीघार्युष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर सकाळी १० वाजता सुरू झालेले शिबिर संध्याकाळी ६ वाजता संपले. शिबिराचे उद्घाटन माजी आमदार रामचंद्र अवसरे, जिल्हा उपाध्यक्ष विलास काटेखाये, अनिल मेंढे, सुवर्णा मुंगाटे, कीसनाबाई भानारकर, डॉ. उल्हास हरडे, तालुकाध्यक्ष मोहन सुरकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी १५३ जणांनी रक्तदान केले. रक्तदान करण्यासाठी रीघ लावून तरुण हजर होते. जिल्ह्यात एकाच दिवशी अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. मात्र पवनी येथील शिबिर अनोखे ठरले. पहिल्यांदाच एखाद्या शिबिरात १५३ च्या घरात रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या. या शिबिरासाठी भाजपाचे अध्यक्ष मोहन सूरकर, मच्छिंद्र हटवार, अमोल उराडे, दीपक बावनकर यांच्यासह अन्य पदाधिका-यांनी परिश्रम केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *