घराचे अर्धवट बांधकाम सोडून कंत्राटदाराने केली फसवणूक

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : घर बांधकाम परवडत नाही असे सांगून अर्धवट बांधकाम करून सोडून दिले. करारपत्राप्रमाणे काम केले नाही. उर्वरित घराचे बांधकाम करून देईल अशा थापा कंत्राटदार मारीत आहे. त्यामुळे माझी फसवणूक झाली असा आरोप मोहाडी येथील योगेश गिरेपुंजे यांनी रविवार दि. १८ सप्टेंबर २०२२ ला दुपारी ४ वाजता शासकीय विश्रामगृह मोहाडी येथे घेण्यात आलेल्या वार्ताहर परिषदेत केला. मोहाडी येथील योगेश गिरेपुंजे व कंत्राटदार अभियंता प्रणय वाहाने यांच्यात मागील वर्षी दि. २५ आॅक्टोबर २०२२ ला बांधकामाचा शंभर रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा करण्यात आला. दि.२६ सप्टेंबर २०२२ पर्यंत नऊ महिन्यात संपूर्ण बांधकाम करण्यात येईल असेही ठरले होते. वेळोवेळी कामाचे पैसे देण्यात येत होते. आतापर्यंत काम दिलेल्या कंत्राटदाराला २९ लक्ष ४० हजार रुपये दिले गेले असे योगेश गिरेपुंजे यांनी सांगितले.

उर्वरित घराचा बांधकाम शिल्लक असताना त्यांनी घराचे काम बंद केले आहे. घराचे काम पूर्ण का करीत नाही याविषयी अनेकदा भ्रमणध्वनीवर संपर्क केला. मात्र, त्यांनी मला बांधकाम परवडत नाही असे सांगितले. तकादा लावला तेंव्हा, काम पूर्ण करून देतो असे सांगितले जाते. पंचवीस दिवसापासून काम करून देतो अशा थापा ते कंत्राटदार मारत आहेत. अभियंता प्रणय वाहाने हे मोहाडी पंचायत समितीला कंत्राटी तत्वावर काम करतात. त्यांची भेट घेता यावी म्हणून एका पदाधिकाºयांच्या दालनात गेलो. त्यांनी त्या कंत्राटी अभियंता वाहने यांना बोलावले, पण ते आले नाही. सातत्याने त्यांना आमोरसमोर भेटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी भेट घेणे टाळले. त्यामुळे माझी त्या कंत्राटदारांनी फसवणूक केल्याचे लक्षात आले. माझे त्यांना साधारणत: दोन लक्ष रुपये अधिक गेल्याचे योगेश गिरीपुंजे यांनी सांगितले. माझी फसवणूक झाली, इतरांनी त्या कंत्राटदारापासून सावध राहावे यासाठी मी मोहाडी येथे वार्ताहर परिषद घेत असल्याचे त्यांनी सांगितले. मोहाडी पंचायत समितीमध्ये ते कंत्राटी तत्वावर काम करीत असल्याने त्यांची तक्रार मोहाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांकडे करणार असल्याचे योगेश गिरीपुंजे यांनी वार्ताहर परिषदेत स्पष्ट केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *