जादूटोण्याच्या संशयातून परिचर यांचा खुन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- माझ्या मुलावर जादुटोणा केला अन माझ्या मुलाचा मृत्यू झाला, असा समज धरून ग्रामपंचायत परिचरावर चक्क टाटासुमो चढवुन त्याचा खुन केल्याची घटना दवनीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. यशवंत सुरज मेंढे रा. दवनीवाडा असे मृताचे नाव आहे. मृत यशवंत मेंढे दवनीवाडा ग्रामपंचायतीमध्ये परिचर म्हणुन कार्यरत होते. तर आरोपी प्रवीण नेवारे ३८ वर्ष याचा त्यांच्या सोबत जुना वाद होता. ग्राम पंचायतचे कामकाज आटोपुन यशवंत मेंढे घरी जाण्यासाठी ग्रामपंचायत मधुन आपल्या सायकल ने निघाले असता ग्रामपंचायतच्या गेटवर आरोपी प्रवीण नेवारे याने टाटा सुमो क्रमांक एमएच ३४ एए ९१४५ त्यांच्याअंगावर चढविली. तीन टेचात दा मागे पुढे घेत यशवंत मेंढे यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. यशवंत मेंढे यांनी ग्रामपंचायत मधुन मिळणा-या लाभापासुन मला वंचित ठेवले आणि मुलास जादुटोणा केला आणि मुलाचा मृत्यु झाला या संशयातून आरोपीने हे कृत्य केल्याची पोलीस तपासात आल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी दिली. तर दवनिवाडा पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून गावातील परिस्थितीला सावरून आरोपी विरूध्द भादंविच्या कलम ३०७, ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असुन ४ आॅक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *