फेसबुक फ्रेंड ने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग;आरोपीला १० वर्षाचा सश्रम कारावास

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाºया आरोपीला भंडारा जिल्हा सत्र व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दहा वर्षाचा सश्रम कारावास व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली. योगेश ब्रिजकिशोर आगासे वय १८ वर्षे रा.मुजबी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सन २०१८ मध्ये आरोपी योगेश व पिडीतेची पेष्ठसबुकवर ओळख झाली. दरम्यान आरोपी व फिर्यादी हे एकमेकांना भेटू लागले. पिडीता ही शेडुल कास्ट ची असल्याचे माहीत असतांना सुदधा आरोपीने तिला फोनवरुन व्हॉट्सअपव्दारे अश्लिल मॅसेज, करुन तसेच पिडीतेचा पाठलाग करीत तिची रस्त्यात अडवणुक करीत तिचे फोटो व्हॉट्सअप, फेसबुकवर वायरल करुन बदनामी करण्याची धमकी देत होता.या त्रासाला कंटाळुन पिडीतेने पोलीस स्टेषन भंडारा येथे तक्रार नोंदविल्याने आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेता सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रिना जनबंधु यांनी तात्काळ घटनास्थळ गाठुन तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान आरोपी विरोधात योग्य व सबळ पुरावे मिळुन आल्याने पोलीसांनी अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश व अतिरीक्त सत्र न्यायाधीश भंडारा येथे आरोपपत्र दाखल केले. सदर गुन्हयाची सुनावणी अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधिश श्री. पी. बी. तिजारे यांचे न्यायालयींन कक्षात चालविण्यात आली. प्रकरणात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील श्रीमती दुर्गा तलमले, यांनी योग्य बाजु मांडुन साक्षदार तपासले .पुराव्यांचे आधारे आरोपी योगेश ब्रिजकीशोर आगासे याच्यावरील आरोप सिध्द झाल्याने ०२ आॅक्टोंबर २०२२ रोजी आरोपीला विविध कलमांअर्गत दहा वषार्चा कारावास व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी श्रीमती रिना जनबंधू, भंडारा ठाणेदार सुुभाष बारसे ठाणेदार , पोलीस हवालदार छोटेलाल रहांगडाले ब. नं. ७८७ यांनी योग्य पैरवी अधिकारी म्हणुन कामकाज सांभाळले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *