“भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या हॉटेलात गोमांस”

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गो हत्या ला विरोध करणाठया भाजपचे पितळ उघडे पडले आहे. नायजेरियात लंपी आजार आढळून येतो. नायजेरियातून चिता आणून भाजपने काय साध्य केले? असा प्रश्न उपस्थित करीत भाजप सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला. गोमांस विक्रीला विरोध करणाठया भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या गोव्यातील हॉटेलमध्ये गोमांस आढळून आल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा येथे माध्यमांशी बोलताना केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज भंडारा येथे आले होते. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर नाना पटोले माध्यमांशी बोलत होते, राहुल गांधी यांची यात्रा नसून ती आता एक लोक चळवळ झाली आहे.

देशात तिरंगा टिकवायचा असल्यामुळे या चळवळीला मोठी प्रतिसाद मिळत आहे. नायजेरिया देशात लंपी या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्याच देशातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिता भारतात आणला. देशात गरिबी, बेरोजगारी, महागाई, सीमावाद मोठ्या प्रमाणात असताना चिता आणून दिखावा करण्याचे काम करण्यात येत आहे. भाजप शेतकरी विरोधी असून त्यांना बरबाद करण्यासाठी लंपी या रोगाची धास्ती दाखवून गोधन संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात मागील काही दिवसापासून सिटी १ वाघाने धुमाकूळ घातला आहे. हा वाघ भंडारा गोंदिया गडचिरोली या तीन जिल्ह्यात भ्रमंती करीत असून आतापर्यंत १८ जणांचा जीव घेतला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी पूर्णपणे धास्तावलेले असून शेतीवर जाण्यास धजावत आहेत. अशा नरभक्षी वाघाला कोंबिंग आॅपरेशन करून ठार करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. यावेळी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई,जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, जिल्हा परिषद सभापती रमेश पारधी तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *