लाचलुचपत प्रतिबंध विभागातर्फे भ्रष्टाचाराबाबत जनजागृती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : लाचलुचपत प्रतिबंध विभाग भंडारातर्फे भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह निमित्त संपुर्ण जिल्ह्यात पथनाट्याद्वारे भ्रष्टाचाराबाबत जनजागृती करण्यात आली. महाराष्टÑ सरकारच्या वतीने संपूर्ण राज्यात दिनांक ३१ आॅक्टोंबर २०२२ ते ६ नोव्हेंबर २०२२ पर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा तर्फे दिनांक २ नोव्हेंबर २०२२ रोजी भंडारा जिल्ह्यातील कोंढा/कोसरा, मोहाडी तसेच भंडारा शहरातील शुक्रवारी येथील किसान चौक येथे “भंडारा युवक बिरादरी” च्या कलावंतांनी पथनाट्य सादर करून त्या माध्यमातून भ्रष्टाचार प्रतिबंध करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी सामान्य जनतेमध्ये भ्रष्टाचार करणारे लोकसेवक त्यांचे विरुद्ध लाचालुचपत प्रतिबंध विभाग येथे येऊन तक्रार देण्याचे किंवा भ्रष्टाचारा संबंधाने तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान भंडारा लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उप-अधीक्षक महेश चाटे व त्यांचे कार्यालयीन सहकारी अधिकारी/कर्मचारी यांनी नागरीकांना कोणताही सरकारी अधिकारी/कर्मचारी शासकीय शुल्का व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारच्या लाचेची मागणी करीत असल्यास त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभाग, भंडारा येथे टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा कार्यालचे दुरध्वनी क्रमांक -०७१८४२५२६६१ वर संपर्क करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *