देव्हाडी उड्डान पुलाला भगदाड, अपघाताची दाट शक्यता

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी खरबी : मनसर-रामटेक गोंदिया- महामार्गावरील देव्हाडी उड्डान पुलावर भला मोठा खड्डा पडल्याने एन. एन. कंट्रक्शन कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून सदर कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देव्हाडी स्टेशनचे उपसरपंच श्याम नागपूरे यांनी केली आहे. तुमसर तिरोडा मार्गावरील देव्हाडी रेल्वे स्टेशन येथे रेल्वेच्या आवागमनाने रेल्वे फाटक बंद करण्यात येत असल्याने दोन्ही बाजुंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या.त्यामुळे वाहतुक विस्कळीत होवुन प्रवाशी नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.त्यामुळे या ठिकाणी रेल्ेव रेल्वे क्रॉसिंग करिता उडान पूलाचे बांधकाम करण्यात आले.मात्र सदर उडान पुलाला दहा फूट खोल असा भला मोठा भगदाड (खड्डा )पडला असुन या मार्गाने सुसाट जाणाºया वाहनांना अपघात होवुन धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही .

पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह तुमसर -गोंदिया महामार्गावर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू असुन जवळपास ते पुर्णत्वास आले आहे. राज्य सरकार व रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने २०१४ ला या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली. पाच ते सहा वर्ष पुलाचे काम कासव गतीने चालू होते. देव्हाडी इथे मुंबई- हावडा या रेल्वे लाईन वर फाटक क्रमांक ५५२ वर एकूण शंभरच्या वर रेल्वेगाड्या धावत असतात. फुगेलिया कन्स्ट्रक्शन कंपनी ने या पुलाचे बांधकाम केले. मात्र काही दिवसातच रहदारी सुरू झाल्यानंतर पुलावरील रस्त्यामध्ये पाच ते सात फिट खोलगट असा खड्डा/ भगदाड पडल्याने या खड्ड्यामुळे येणारा जाणाºया वाहनांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी स्टेशनटोली (दे) चे उपसरपंच श्याम नागपुरे यांनी केली आहे. या मार्गाचे अनेकदा दुरूस्ती करूनसुध्दा पाच सहामहिन्यांमध्येच या महामार्गावरील उड्डान पुलावर नेहमी खड्डे पडत असतात . पाऊस पडला की पुलांच्या दगडांमध्ये भरलेली राख बाहेर निघत असुन या पुलाला दुरुस्तीचे ग्रहण लागले आहे. आज उडान पुलाच्या मधोमध भला मोठा खड्डा पडल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण झाले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.