ड्रोन μलाईंग ने एक-एक इंचाचे सर्व्हे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- शासनाच्या मालकीच्या योजनेंतर्गत जमिनीचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्यात येत आहे. याची सुरवात आज गोंदिया तालुक्याच्या निलागोंदी या गावापासून करण्यात आली आहे. या ड्रोन उड्डाणाच्या माध्यमातून जमिनीच्या प्रत्येकी एक एक इंच जागेचे सर्वे करून अचूक सर्वेक्षण केले जात आहे. त्यामुळे जमीन मालकांना त्यांच्या मालकीचे हक्काचे पत्र मिळणार आहे. त्याचा लाभ जमीन मालकांना बँकेतून कर्ज घेण्यासाठी इतर योजने साठी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात लाखो शेतकरी आणि जमीन मालक आहेत, पण जेव्हा कोणाची जमीन विकायची असेल किंवा वेगळा नकाशा तयार करायचा असतो तेव्हा जमिनीचे विभाजन आणि विक्रीची कालमर्यादा यावरून नेहमीच वाद होतात. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्याचबरोबर जमिनीची मालकी न मिळाल्याने अनेक जमीन मालकांना योजनांचा लाभ व कजार्पासून वंचित राहावे लागते. जमीन मालकांना त्यांचे अधिकार पत्र मिळावे आणि सीमा व नकाशावरून निर्माण होणाºया वादातून सुटका व्हावी, यासाठी ड्रोन μलाईंग द्वारे अचूक सर्वे करण्याची योजना स्वामीत्मा योजनेंअतर्गत सुरू करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील निलागोंदी या गावातून ड्रोन μलाईंग माध्यमातून जमिनीच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. या अचूक सर्वेक्षणाच्या माध्यमातून जमीन मालकांना त्यांच्या हक्काचे मालकी हक्क पत्र मिळू शकणार आहे. ज्याचा उपयोग कर्ज घेण्यासाठी, वादांपासून दूर राहण्यासाठी आणि वषार्नुवर्षे सुरू असलेल्या वादांच्या समस्या सोडवण्यासाठी केला जाईल. ड्रोन μलाईंग शुभारंभ अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अधिकारी रोहिणी सगरे, उपअधीक्षक प्रमोद बोकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निलागोंदीचे ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *