रेल्वे पोलिसांनी उधडला गांजा तस्करीचा डाव : ९८ हजाराचा गांजा जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : रेल्वेतून गांजा या अंमली पदार्थाची तस्करी करण्याचा डाव रेल्वे पोलिसांनी विशेष मोहिम राबवून उधळून लावला. यावेळी रेल्वे क्रमांक १२८४३ मधून एकूण ९.८६५ किलोग्रॅम गांज्याचे दोन पाकिट आढळून आले असून ज्याची किंमत ९८ हजार ६५० रुपये आहे. भंडारारोड रेल्वे स्थानक येथे दक्षिण-पूर्व-मध्ये रेल्वे नागपूर विभागीय रेल्वे सुरक्षा बल आयुक्त पंकज चूघ यांच्या मार्गदर्शनात प्रवासी सुरक्षेसंदर्भात २६ नोव्हेंबर रोजी विशेष मोहिम राबविण्यात आली. दरम्यान रेल्वे क्रमांक १२८४३ च्या कोच क्रमांक ड-७ मध्ये तपासणी दरम्यान एक लाल व काळ्या रंगाची पिशवी बेवारस स्थितीत आढळून आली. तिची तपासणी केली असता गांजा आढळून आला. सदर गांजा तस्करी प्रकरणात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.