प्राचार्य महोदय, विद्यार्थ्यांना जेवण बरोबर देत नाही का?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जिल्हयातील नवेगावबांध स्थित जवाहर नवोदय विद्यालय हे केंद्रिय विद्यालय असून येथे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना शासनाकडून शिक्षणासोबतच राहण्याची व जेवण नाश्ताची संपूर्ण सोय असते. पण येथील मेरा -भोजनगृहात मिळणारा जेवण हा चविष्ट राहतो की नाही कुणास ठाउक! गेल्या आठवडयात येथील निलगीरी ज्युनिअर हाउस मधील काही मुलांनी मेस मधून तांदूळ आणि तेल ची चोरी करून त्यांना आवडत असलेला पुलाव स्वत: रात्रीच्या सुमारास शिजवून खाण्याचा प्रयत्न केला असल्याची एक घटना घडली. येथील मुलांना पालकवर्ग भविष्यातील डॉक्टर, इंजिनिअर, जिल्हाधिकारी, तहसीलदार होणार अश्या आशेने येथे घरापासून लांब राहून शिक्षण घेण्याकरिता पाठवतो. ते सुसंस्कारित व्हावे, व उच्चपदस्थ व्हावे अशी सुमारे सगळ्यांच पालकांची इच्छा असते. पण हे काय जवाहर नवोदय येथील विद्यार्थी तेथील मेस मधून तांदूळ व तेल चोरी करून शिजवण्याकरिता एका पातेला व तिखट, मीठ, हळद आदींची जुळवाजुळव करून पुलाव खाण्याकरिता लपून छपून आटापिटा करण्याचा प्रयत्न करतात.

याला काय म्हणावे. सातवी आठवी वर्गात शिक्षण घेणारे हे मुलं जर आता पासून येथील मेस मधे तांदूळ, तेल आदी चोरी करून ते शिजवून खाण्याचा प्रयत्न करीत असतील तर येथील मेस मध्ये त्यांना चविष्ट जेवण मिळतो की नाही या वर शंका उपस्थित होतात. सुमारे समृद्ध घरातील मुले येथे शिक्षण घेतात. त्यामुळे ते संस्कारित तर असतातच पण पुलाव खाण्याकरिता त्यांच्या द्वारे करण्यात येणारा आटापिटा समजण्या पलिकडे आहे. निलगीरी ज्यू, हाउस मधील कॅप्टन ने रात्रीच्या सुमारास झोपेतून उठून त्यांचे हे कृत्य पकडून उघडकिस आणले. व नवोदय प्रशासनाला घडलेल्या प्रकाराबद्दल कळविला असल्याने हे कृत्य उघडकिस आले. सध्या मुलांना तंबी व समज देवून सोडण्यात आले आहे. पण घडलेला प्रकार येथे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या इतर पालकवर्गा करिता चिंतनिय असल्याचेच आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *