धर्मापुरी येथील अवैध रेती उपसा थांबविण्याची मागणी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : धर्मापुरी व कुंभली येथील चुलबंद नदीच्या पात्रातील रेती अवैधरित्या २०० पेक्षाही जास्त बैल बंड्यांनी नेत असल्याने अवैधरीत्या होणारा रेती उपसा थांबवावा यासाठी धर्मापुरी येथील नागरिकांनी धर्मापुरी गट ग्रामपंचायतच्या सरपंचांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे. कुंभली येथील चुलबंद नदी पात्रातून २०० पेक्षाही अधिक बैलबंड्या रोज रेती उपसा करून नेल्या जात आहे त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. तसेच नदीपत्रातील जास्त रेती उपसामुळे नदीचे पात्रातील पाण्याचा प्रवाहाची दिशा बदलून किनारा खचत आहे. सतत चालणाºया बैलबंड्यामुळे गावकºयांना त्रास होत असून रस्तेही खराब होत आहे. त्यामुळे अवैध रेतीचा उपसा थांबवावा अशी मागणी धर्मापुरी येथील गावकºयांनी सरपंचाकडे निवेदनातून केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.