शहापूर शिवारातील नांदोरा ते ठाणा ,शहापूर रस्त्यावर धारदार शस्त्राने खून करून फेकलेला मृतदेह आढळला

परिसरात दहशतीचे वातावरन,परिसरात आठवड्यातील तिसरा खुनी हत्याकांड
जवाहरनगर :- आज सकाळी ९ जवाहरनगर परिसरातील नांदोरा ( हेटी) ,ते ठाणा,शहापूर रस्त्यावर अज्ञात व्यकितीचे खून करून प्रेत रस्त्यावर फेकले गेल्याची घटना उजेळात आल्याने,एका पाठोपाठ आठवड्यातील तिसरी घटना घडल्याने परीसर हादरून गेला आहे.

परिसरातील शहापूर जवळील जुना राष्ट्रीय महामार्गाच्या काही अंतरावरील नांदोरा टोली ते शहापूर ठाणा, पेट्रोल पंप रस्त्याचे काही अंतरावर धारदार शस्त्राने डोक्यावर मारा करून रक्त बंबाल अवस्थेत पडलेला मृतदेह आज दिनांक ६ एप्रिल च्या पहाटे दूध विक्री करणाऱ्या ईसमाना दिसले ,ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली असता, जवाहरनगर पोलिसाना याची माहिती दिले,तेव्हा पर्यंत या ठिकाणी पाहणाऱ्या नागरिकांनी बाजाराचे रूप धारण केले होते.

हत्या करून मृतदेह फेकणाऱ्या ईसमाची ओळख पटली असूनजिशान गौस मोहम्मद शेख वय ३४ रा.साकोली ता.साकोली जिल्हा भंडारा( मूळ गावं धारगाव) असे त्या मृतक युवकाचे नाव असल्याचे कळले आहे. २०१४ साली आंतर जातीय विवाह केल्याने साकोली येथे वास्तव्य करीत होता .घटनेचा आदल्या दिवशी ठाणा पेट्रोल पंप येथील मुख्य चौकातील पान टपरीच्या जवळपास भटकंती करताना काही नागरिकांना आढळला,घटना स्थळ व काही अंतरावर रक्ताचे नमुने व चीलंम सापडले आहे कदाचित एका ठिकाणी हत्या करून त्याचे मृतदेह दुसऱ्या ठिकाणी आणून ठेवल्याचे खुनी निशाणी आढळून आल्या आहेत नेमक्या कुठल्या कारणाने हत्या केली गेली हा पोलिसांच्या तपासातील मुद्दा बनला आहे
घटना स्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,जवाहरनगर पोलिस ठाणेदार सुधिर बोरकुटे व जिल्हा पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी भेट देऊन खून्हाचा गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. अद्याप पर्यंत या खुनाचे कारण व मारेकरी कोण याचा शोध लागलेला नाही आहे.
………
पैसे घेऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तर……..
शहापूर शिवारातील आज पहाटे उजेडात आलेला धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह आढळलेल्या ठिकाणी मृतकाची ओळख पटविण्यासाठी आलेल्या मृतकाच्या बहिणीने जमलेल्या नागरीकांच्या उपस्थित जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांना खुले आवाहन केल्याचे दिसून आले आहे . सदर महिला ही वकील असल्याचे बोलले जात आहे
………………..
अड्याल पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुधिर बोरकुटे यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यातील ठाणेदार पदाचा कार्यभार सांभाळलेले तेव्हा पासून एका आठवड्यात खरबी नाका येथील स्मशान भूमीत अज्ञात महिलेला प्लॅस्टिक पिशवीत ठेवलेला मृतदेह विवस्त्र अवस्थेत,चेहरा जळालेला आढळून आला.तर दुसरी घटना निहरवणी ठाणा पेट्रोल पंप रस्त्यावर भर दिवसा एका युवकाचा तिहेरी प्रेम प्रकरणातून भलत्याच ठाणा पेट्रोल पंप येथील युवकाचा खून व आज शहापूर शिवारात जिशान गौस मोहम्मद शेख या तरुण युवकाचा खून करून आढलून आलेला मृतदेह या तिहेरी हत्याकांडातील तपासातील गती व पोलिसांची तपास यंत्रणा कुठ न्यायापर्यन्त व कधी पर्यंत पोहचेल हा पोलिसांपुढे पडलेला प्रश्न आहे?
……….

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *