नीलगाईंची शिकार करणारे जाळ्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर: आज भाजपचा बालेकि पुसद : पुसद उपवन कार्यालय अंतर्गत काळी (दौलतखान) वनपरिक्षेत्र हद्दीत काळी (दौ.) ते मोहदी मार्गावर दोन चारचाकी वाहनांतून ३ नीलगाईंची शिकार करून घेऊन जात असताना ७ आरोपींना पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व वनविभागाने सापळा रचून रविवार, १६ एप्रिलच्या पहाटे २.३० वाजता पोहचून पाळत ठेवली. हे पथक या तीन नीलगायींचे माखलेल्या ३ लोखंडी सुरे जेरबंद केले. वनपरिक्षेत्र काळी (दौ) मधील वर्तुळ काळीमध्ये स्थागुशा उपनिरीक्षक सागर भारस्कर यांनी फोनद्वारे मोहदी ते काळी (दौ) रस्त्याने वन्यप्राणी नीलगायींची शिकार करून वाहनामध्ये घेऊन जाणार असल्याचे कळविले.

वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण राऊत, क्षेत्र सहायक गंगाखेडे, बदुकले, वनपरिक्षेत्र अधिकारी लिमकर, वनपाल शेख मुखबीर शेख गुलाब यांच्यासह वनकर्मचाºयांनी खाजगी वाहनाने काळी दौ बसस्थानकाजवळ नाकाबंदी करून थांबले असता त्यांनी चारचाकी वाहन कह्यमांक एमएच २९ एफ०१६९ काळी (दौ.) येथे थांबवले. या वाहनाची झडती घेतली. या वाहनात वाहनचालक अदिलखान एजाज खान (वसंतनगर, पुसद) याच्यासह फैयद अहमद मुस्ताक अहमद (गढीवार्ड, पुसद) आणि गाडीमध्ये मागील बाजूस अंदाजे तीन वर्षे वयाच्या तीन मृत नीलगायी आढळून आल्या. मानेपासून तोडलेल्या मागील शरीराचे मध्यभागापासून केलेले प्रत्येकी दोन तुकडे असे एकूण६ तुकडे केलेले होते. या गाडीमध्ये ताजे रक्तही सांडलेले होते.

त्यांचाच सोबतच्या दुसºया स्कार्पिओ वाहन एमएच २० एजी २००५ यात इमह्यान खान अहमद सुल्तान, उस्मान खान कदीर खान, शेख आसद शेख युनुस, समीर खान असद खान आणि शेख शाहरुख शेख उस्मान हे पुसद व नांदेड परिसरातील आरोपी रक्ताने आणि एका लोखंडी कोयत्यासह आढळून आले. या आरोपींना भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार अटक केली असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या अटक केलेल्या आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. पुसद उपवनसंरक्षक सोनकुसरे यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक डॉ. म. प्र. गुजर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण राऊत पुढील तपास करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *