‘बाबरीच्या वेळेस बाळासाहेब नाही तर मग तुमचे काका गेले होते का?’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर: आज भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरात महाविकास आघाडाची वज्रमूठ सभा पार पडली. यावेळी तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. शिवसेना(उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदेंसह भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी अयोध्येचा मुद्दाही उपस्थित केला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘मी श्रेय का घेताय? मुख्यमंत्री आता अयोध्येला गेले. ते खरे रामभक्त असते तर आधी सूरत आणि गुवाहाटीला नाही तर अयोध्येला गेले असते. आताचे उपमुख्यमंत्री यापूर्वी कधीच अयोध्येला गेले नाही. पण, मुख्यमंत्री गेले म्हणून हे त्यांच्यासोबत गेले. तुझा शर्ट माज्यापेक्षा जास्त भगवा कसा? यासाठीच हे अयोध्येला गेले. चंद्रकांत पाटील बोलले की, पहिल्यांदा अयोध्येला गेलो होतो, तेव्हा प्रकरण कोर्टात प्रलंबित होते. पहिले मंदिर मग सरकार असं आम्ही बोललो होतो. तेव्हा पंतप्रधान मोदींना आधीच बोललो होतो की, तुमचे सरकार आहे, आपण राम मंदिर बनवूया.

ते सुप्रीम कोर्टात काय व्हायचं ते होऊ द्या म्हणाले. मग आता बाबरीच्या वेळेला बाळासाहेब नव्हते, मग तुमचे काका गेले होते का? बाबरी पाडल्यानंतर भाजपच्या गोटात पळापळ झाली होती. शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी फोनवर सांगितलं होतं की, जर बाबरी माज्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असंही तेम्हणाले मी माज्या वडिलांचे नाव घेऊन येतो, तुम्ही तुमच्या वडिलांचे नाव घेऊन मैदानात या. आम्ही काँग्रेसबरोबर का गेलो? आम्हाल कोणी घालावलं? मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदूत्व सोडलं बोलतात. मला संघाला विचारायचं आहे की, नेमकं तुमचं चाललंय काय? आमचं शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही. यांचं हिंदुत्व गोमुत्रधारी हिंदुत्व आहे. गोमुत्र शिंपडता त्यापेक्षा थोडं प्राशन करा, अक्कल येईल.

ते शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व नाकारत आहेत. मोहन भागवत मशिदीत जाऊन आले. एकाबाजूला हनुमान चालीसा म्हणायची आणि मशिदीत दाऊन कव्वाली ऐकणार. हे यांचं हिंदुत्व आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. ‘आपल्या देशात लोकशाही आहे असं आपण मानतो पण, देशातील लोकशाहीचा उपयोग सत्ताधा?्यांच्या मित्रांसाठीच होत आहे. त्यांचे मित्र जगात श्रीमंतांच्या यादीत अव्वलआहेत आणि आपल्या देशाचा क्रमांक खाली-खाली येत आहे. भारत मातेच्या पायामध्ये पुन्हा बेड्या घालण्याचे काम सुरू आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचे रक्षण करण्याची वेळ आली आहे.’ ‘आमच्या सरकारने काहीच कामे केली नाही, असे ते बोलतात. पण, आमच्या काळात जागतिक संकट आले होते. आज चार चार दिवसांनी गारपीट होते, शेतक?्यांचे मोठे नुकसान होते. तरीदेखील शेतक?्यांना काही मिळतं नाही. हे उलट्या पायाचे सरकार आहे. आमचं सरकार आमच्या पाठीत वार केला.

महाराष्ट्र शूरांचा आहे, पाठीमागून वार करणारा महाराष्ट्र नाही. आम्ही वार झेलू तर छातीवर आणि वार करू तर छातीवरच करू. ही शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. आजचे मुख्यमंत्री अयोध्येला जातात. पण, हे खरंच रामभक्त असते तर आधी सूरतगुवाहाटीला न जाता अदोध्येले गेले असते.’ ‘आधीचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापूर्वी कधीच अयोध्येला गेले नाही. आता नालायक असतं, तर एवढी लोकं आलीच नसती. आमच्या काळात आम्ही कमीत कमी वेळेत मदत पोहोचवली होती. आजचे सरकार भूलथापा मारणारे सरकार आहे,’ अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली. ते पुढे म्हणतात, ‘आमचं सरकार यांनी गद्दारी करुन पाडलं. यांनी मुख्यमंत्र्यांच्या मागे मागे गेले. तुझा शर्ट माज्यापेक्षा भगवा कसा, यासाठीच यांचा दौरा होता. आज शेतक?्यांना रात्रभर झोप येत नाही आणि सत्ताधारी देवदर्शनाला जातात. रामराज्य कधी येणार माज्या महाराष्ट्रात, देशात? तुमच्या पदाचा काय उपयोग ? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.