युवकाची आत्महत्या

लाखांदूर : एका २५ वर्षीय युवकाने शेताशिवरात झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज ३० एप्रिल रोजी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील किरमटी शेतशिवारात उघडकीस आली. कुणाल ज्ञानेश्वर केझरकार वय २५ रा. किरमटी असे मृत युवकाचे नाव आहे. मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. घटनेच्या दिवशी स्थानिक किरमटी येथील भास्कर मेश्राम हे नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास शेतशिवाराकडे जात असताना येथील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील देशकर यांच्या शेतातील उमरीच्या झाडाला एक युवक गळफास घेवून लटकलेल्या स्थितीत दिसला.

त्यांनी लगेचच या घटनेची माहिती गावात दिली. ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेतली असता मृतक कुणाल केझरकार असल्याचे स्पष्ट झाले. कुनालाने शर्ट च्या साहाय्याने गळफास घेवून स्वत:ची जीवनयात्रा संपविली होती. दरम्यान घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली असता लाखांदूर पोलिसांनी घटनस्थळ मृतदेह शविच्छेदनासाठी लाखांदूर शवागारात पाठविले. घटनेचा पुढील तपास लाखांदूर चे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *