पदाचा गैरवापर करुन गटविकास अधिकारी करतात हिटलरशाही!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : मागील दोन वर्षे संपुर्ण भारतात कोराना विषाणुचा प्रदुर्भाव असल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक झाले नाही व शासनाकडुन प्रशासन नियुक्त करण्यात आले होते.त्यामुळे आज निवडणुक होऊनही मे २०२२ पासुन जिल्हा परिषद भंडारा व पंचायत समिती मध्ये पदाधिकारी यांची निवड झाली आहे व त्यांना पदसिध्दचे अधिकार शासनाकडुन प्राप्त झाले आहे. परंतु कार्यरत अधिकारी यांना असे वाटते की अद्यापही आम्ही प्रशासक असुन आम्ही आपल्या मर्जी ने पंचायत समिती चालवुन व पदाधिकारी व शासनाचे नियमाचे धज्जी उडवुन व पैसा कमवुन परंतु आता तस होणार नाही लोकशाहीप्रदान देश असल्यामुळे जनतेकडुन निवडुण आलेले पदाधिकारी हे पदावर बसलेले आहे व त्यांना ग्रामीण भागातील जनतेच्या व गरजु लोकांचे काम करणे आवश्यक आहे व त्यांचे समाधान होणे गरजेचे आहे त्या करीताच आम्हाला त्यांनी निवडुण दिलेले आहे.

सोमवार दि.३ आॅक्टोबर २०२२ ला गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहाडी यांचा कक्षात जाऊन लोकांनी मला दिलेल्या समस्यांचे निवेदन दिले व सदर कामाचे त्यांचे निराकरण अद्यापही केलेले नाही या बाबत चर्चा करीत असतांना गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहाडी यांनी मला उलट उत्तर देऊन बोलले की मी माझा मी पाहीण काय करायचे आहे ते असे बोलून त्यांनी माझा अपमान केला व सभापती या पदाचा अपमान केलेला आहे तेव्हा मी त्यांना बोललो मॅडम आपणाकडे पाचगाव येथील ग्रामसेवक यांची लोकांना तक्रार केलेली आहे.आणि त्या ग्रामसेवकाची आपल्याकडे विनंती अर्ज करून त्यांचाकडे असलेला पाचगाव ग्रामपंचायचा अतिरिक्त कार्यभार काढण्यात यावा व या संदर्भात मी पंचायत समिती येथे कार्यरत विस्तार अधिकारी यांना सुध्दा बोलले आहे की साहेब पाचगाव येथील ग्रामसेवक सार्वे यांनी विनंती केली आहे.त्यांचा पाचगाव येथील असलेला अतिरिक्त चार्ज काढण्यात यावा.

त्यावेळी विस्तार अधिकारी यांनी सांगीतले की साहेब त्यांचाकडे पाचगाव येथील अतिरिक्त कार्यभार काढण्याबाबतची नस्ती गटविकास अधिकारी यांचा टेबलावर आहे आणि ते म्हणाले ठिक आहे आपण पाचगाव येथील गावकºयांचे कामे लवकरात लवकर होण्याच्या दृष्टी ने तेथील प्रकरण शांत करून व त्यांचा ऐवजी दुसरे ग्रामसेवक यांची नियुक्ती करुन नंतर मी गटविकास अधिकारी कु.पल्लवी वाडेकर मॅडम यांचा सोबत चर्चा केली की पाचगाव येथील प्रकरण शांत करा आणि दुसरे ग्रामसेवक यांची त्या ठिकाणी बदली करा तसेच आमदार राजु कारेमोरे यांनी सुध्दा सदर प्रकरणात गटविकास अधिकारी यांना भ्रमणध्वनी वर कळविलेले आहे.तसेच पंचायत समिती मधील प्रदीप राऊत वरिष्ठ सहाय्यक यांना सदर प्रकरणात विचारणा केली असता त्यानी सांगीतले की पाचगाव येथे दुसºया ग्रामसेवक देण्यात आले असुन नस्ती मंजुर करुन आदेश काढण्यात आलेले आहे.व सदर आदेशावर जावक रजिस्टर वर नंबर ही चडविण्यात आलेला आहे परंतु अजून पर्यतजावकर चडविलेला पत्र मला मिळालेला नाही आणि त्या सदर्भात दि. ३ आॅक्टोबर २०२२ ला गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर यांना विचारणा केली असता त्यांनी त्यांनी बोलले की माज्याकडे ती फाईल नाही व ते पत्र नाही.मला हेच कळत नाही की बिना साईन केल्याने सदर पत्र जावक रजिस्टर वर कसे चढणार त्यावेळी गटविकास अधिकारी हे त्या संबंधीत कर्मचारी यांना म्हणतात की तो काढलेला पत्र आणि आपण चढविलेला जावक रद्य करा मी पाहीण काय करायचे आहे ते असे बोलुन माज्या लक्षात अआले हे आपल्या पदाचा गैर वापर करून येथील कामे करीत आहे व चांगल्या कामात अडथळे आणित आहे.आम्ही पदावर असुन सुध्दा जर आमचे काम होत नसतील तर लोकांचे काय हाल करणार हा फार गंभीर विषय आहे.

मी मॅडमच्या वागणुकी बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.भंडारा यांना पुष्कळदा सांगीतलेले आहे व पंचायत समितीचे कामाबाबत त्यांना सांगीतले असता मी मॅडम ला सांगितले आहे सदर कामे करण्याबाबत ते करून देतील असे सांगतात व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगीतल्या नंतर ही गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर कामे करीत नाही सदर गटविकास अधिकारी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश ही ऐकत नसेल तर या बाबत आम्ही काय समजावे.सर्व अधिकारी हे उडवाउडवी चे उत्तर देतात यामुळे मोहाडी तालुक्यातील लोकांचा समस्या खुप वाढलेल्या आहे काही ठिकाणी तर ग्रामसेवक सुटटीवर जातात व तेथील ग्रामपंचायत वाºयावर असते तरी सुध्दा याकडे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी (पंचायत) यांचे लक्ष नाही सदर गावातील गावकरी माज्याकडे येतात व ग्रामसेवक साहेब हे कधी येणार किंवा दुसºयांना आपण त्या ठिकाणी कधी पाठविणार हा प्रकार ग्रामपंचायत डोंगरगाव येथे घडलेला आहे गावकºयांचा माज्याकडे येणाचा कारण अशा आहे की,गावकरी पंचायत समिती मोहाडी येथील अधिकाºयांना विचारणा करतात तर ते उडवा उडविचे उत्तर देऊन त्यांना भगवुन देतात त्यामुळे ते माज्याकडे आशेने येतात त्यांचे कामे झाले पाहीजे म्हणुन.तसेच मागील काही दिवसापुर्वी मोहगाव देवी येथील ग्रामपंचायत येथे विशेष बदली म्हणुन आलेली ग्रामसेविकास यांचे सुध्दा एकावर एक बदली आदेश काढण्यात आले हे सुध्दा माहितीचा अधिकारात गावकºयानी मागीतल्यानंतर माज्या लक्षात आली.

सदर प्रकरणात असे होते की, जावक क्र १०४० दिनांक ५आॅगस्ट २०२२ एकच जावक क्रमांक आणि आदेश दोन त्यांच्यात एक रामटेके ग्रामसेवक दुसरे अमृतकर ग्रामसेवक यांच्यातुन दोन्ही ग्रामसेवक मोहगाव देवी येथे कार्यभार घेण्या नकार दिला कारण त्या ठिकणी कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांचा बोगस कारभार पाहुण त्यांनी मोहगाव येथील ग्रामपंचायतीचा कार्यभार घेण्यास गटविकास अधिकारी यांना नकार दिला कारण त्यांना ही आपल्या नौकरीवर गदा येईल यांची त्यांना जाणीव होती. नंतर मी गटविकास अधिकारी यांना सुध्दा सदर प्रकरणात बोललो की मॅडम तेथील प्रकरण शांत करा आणि दुसरे ग्रामसेवक त्या ठिकाणी दयावे तसेच आमदार राजु कारेमोरे यांनी सुध्दा मॅडम ला याबाबत सांगीतले तरी पल्लवी वाडेकर मॅडम एैकाला तयार नाही हा फार गंभीर विषय आहे.सदर प्रकरणात संबधीत लिपिकास विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की साहेब पत्र निघाला आहे आणि जावक रजिस्टर वर चढविण्यात आला आहे. तसेच श्रीमती शहारे ग्रामसेविका यांना मानसिक त्रास देण्यासाठी त्यांनी वारंवार त्यांचे ग्रामपंचायत चे आदेश बदलविले व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मोहाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये असलेली रिक्त पदाची माहिती मागीतली असता वाडेकर यांनी शहारे ग्रामसेविकेला त्रास देण्याचा दृष्टीने फक्त काटेबाम्हणी ग्रामपंचायत मध्ये देण्यात यावे अशे लेखी पाठविले व त्यांचात विस्तार अधिकारी पंचायत हे ही सामतील होते.अशा आहे.बोगस कार्यभार पंचायत समिती मोहाडी येथे सुर उमटत आहे.

सदर गटविकास अधिकारी हे आमचे काम करीत नाही व आपल्या पदाचा गैरवापर करुन हिटलरशाही करीता आहे.अश्या अधिकाºयावर कार्यवाही होणे आवश्यक आहे.तसेच त्यांचामुळे पंचायत समिती येथील कर्मचारी हे दबावामुळे असुन त्यांना सुध्दा गटविकास अधिकारी आपल्या दबावातून उलट सुलट कामे करायला लावतात यामुळे माझे एकच लक्षात आलेले आहे की पल्लवी वाडेकर पंचायत समिती मोहाडी हे फक्त विस्तार अधिकारी पंचायत यांचा म्हणण्याप्रमाणे पंचायत समितीचा कार्यभार चालवित आहे अश्या हेकेखोर अधिकारी यांचावर प्रशासन व मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष देऊन त्यांचावर कार्यवाही करतील का कारण मी वरिष्ठ अधिकाºयांना यांचा कारणाम्या बाबत सांगुन ते लक्ष देत नाही. त्याचा अश्या वागण्यामुळे पंचायत समिती अंतर्गत कार्यरत कर्मचारी ही दहशत मध्ये काम करीत आहे.त्यामुळे पंचायत समिती अंतर्गत असणाºया लाभार्थ्यांचे काम कसे होणार हा फार गंभीर विचार आहे.त्यामुळे आज मला वार्ताहर परिषद घेऊन प्रशासना अंतर्गत चाललेला बोगस कायभारचा खुलाशा करणे गरजेचे वाटले असे मोहाडी पंचायत समितीचे सभापती रितेश भाऊराव वासनिक यांनी मंगळवार दि.४ आॅक्टोबर २०२२ ला दुपारी १२ वाजता शासकीय विश्राम गृह मोहाडी येथे घेण्यात आलेल्या वार्ताहर परिषदमधून माहिती दिली.याप्रसंगी पंचायत समिती सदस्य बाणा सव्वालाखे हजर होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *