वैरावर प्रेमाने व शत्रूवर पराक्रमाने विजय मिळविणारा हा दिवस : सौ.वर्षाताई पटेल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : दसरा सण मोठया उत्साहाने साजरी करण्याची परंपरा आहे. विजय प्राप्त करणारा हा मोठा दिवस आहे. वैरावर प्रेमाने व शत्रूवर पराक्रमाने विजय प्राप्त करणारा हा दिवस विजया दशमी म्हणून साजरा केला जातो. साडे तीन मुहूर्त पैकी एक असा हा विजया दशमी सण मानला जातो. नवरात्र उत्सवात जगत जननी देवीची पूजा मोठ्या आस्थेने करण्यात आली. त्यातच विजया दशमी निमित्त असत्याचे प्रतीक म्हणून रावणाच्या प्रतिकृतीच्या रावणाचा दहन करण्याची वर्षांनुवर्ष पासून जोपासली जात आहे. या शुभ दिनाच्या सर्वांना शुभेच्छा असे मनोगत सौ. वर्षाताई पटेल यांनी व्यक्त केले. गोंदिया येथील नूतन विद्यालयाच्या प्रांगणात दसरा उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सौ.वर्षाताई पटेल ह्या उदघाटक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेंद्र जैन हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संयोजक नानू मुदलियार, सौ.सविता मुदलियार, अशोक नशीने, श्रीवास भंडारकर, राकेश तुरकर, दिलीप काढ़े, सरोदे साहब, संजय दुबे, कैलाश क्षीरसागर, नागेश्वर राव, अनिल शहारे, राजा देशमुख, प्रियेश मुदलियार, कमलेश नासिने, स्वप्निल, पिल्लई,

आयुष क्षीरसागर, अश्विन क्षीरसागर, विक्की शुक्ला, अनिल अलुरु, अशोक अलुरु, राजा सूर्यवंशी, संजय सोनवाने, संदीप काटनकर, पवन परियानी, नलिन जभुलकर, शुभम गायधने, अशोक कटकवार, योगेश रामटेककर, धरम नशीने, महेश जवनिया, नवनीत आगलावे, कुणाल पांडे, लकी शुक्ला, क्षितिज कुंडोजवार, संदीप पारधी, समीर चौधरी, नंदू विश्वकर्मा, रवि राहंगडाले, महेंद्र श्रीवास, मोहित पांडे सहित आदी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की, खासदार प्रफुल पटेल राजकारण बाजूला सारून समाजकार्य करतात. यामुळेच त्यांनी कोरोना काळात आॅक्सीजन पुरवठा, रूग्णालयात आॅक्सीजन प्लांटची निर्मिती, रेमडेसीवीर इंजेक्शन, धान्य कीट आदी पुरविल्याचे सांगीतले. याप्रसंगी कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाºया आरोग्य व पोलीस विभागातील कोरोना योद्धांचा समितीच्यावतीने वर्षा पटेल व राजेंद्र जैन यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात हजारो च्या संख्येत नागरिकांनी हजेरी लावली. फटाक्याच्या आशिषबाजी सह रावणाचे प्रतिक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या आनंदमय कार्यक्रमात सहभागी झालेल्या बच्चे कंपनीने आनंद लुटला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *