ग्रामपंचायत कर्मचाºयांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ग्रामपंचायत कर्मचाºयांना वेतन श्रेणी व इतर सेवा सवलतींच्या मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) जिल्हा भंडाराच्या वतीने दिनांक ६ आॅक्टोबर २०२२ ला जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व युनियनचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. शिवकुमार गणवीर, जिल्हाध्यक्ष कॉ. माधवराव बांते व जिल्हा सचिव कॉ.हिवराज उके यांनी केले. मागण्यांचे निवेदन डॉ. एस. के. पानझाडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत व सामान्य प्रशासन) जिल्हा परिषद भंडारा यांनी स्वीकारले. येत्या ११ आॅक्टोबरला स्थानिक मागण्यांच्या समाधानासाठी संबंधित अधिकाºयांच्या व संघटनेच्या पदाधिकाºयांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करून शासन स्तरावरच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे सांगितले. निवेदनात ग्रामपंचायत कर्मचाºयांना यावलकर समितीच्या शिफारसी प्रमाणे वेतनश्रेणी व इतर सोयी लागू करा,

वेतनावर १००% अनुदान द्या, ग्रॅज्युएटी करीता १० कर्मचाºयांची अट रद्द करा, वेतनासाठी ९०% वसुलीची अट रद्द करा, कालबाह्य झालेला आकृतीबंध रद्द करा, विशेष भत्त्याची थकबाकी द्या, भविष्य निधी नियमित भरा, १०% टक्के आरक्षणाअंतर्गत वर्ग ३ व ४ वर नियुक्ती द्या आणि वरठी ग्रामपंचायतच्या १९ कर्मचाºयांचे वेतन भत्त्याचा बकाया द्या तसेच ग्रामपंचायत कर्मचाºयांची फसवणूक करणाºया तोतया युनियन लीडर गिरीश दाभाडकर व त्यांच्या सहकाºयांवर ४२० चा गुन्हा मा.सि.ओ. साहेबांनी दाखल करावा इत्यादी मागण्या करण्यात आल्या. शिष्टमंडळात कॉ.शिवकुमार गणवीर, कॉ माधवराव बांते, कॉ.हिवराज उके, कॉ. गजानन लाडसे, कॉ. रामलाल बिसणे, कॉ. जयप्रकाश मेहर, कॉ गौरीशंकर धुमनखेडे, कॉ मुरलीधर उरकुडे, कॉ खेमराज सरनागत, कॉ रामू कानतोडे, कॉ. तुलसीदास बनकर इत्यादींचा समावेश होता. शेवटी कॉ. शिवकुमार गणवीर, कॉ हिवराज उके यांचे मार्गदर्शन झाले तर सभाध्यक्ष कॉ.माधवराव बांते यांनी समारोपीय भाषण केले व मागण्यांची पूर्तता न झाल्यास २० तारखे पासून वरठी ग्रामपंचायत समोर बेमुदत आंदोलनाचे आवाहन करण्यात आले व आंदोलनाची सांगता करण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.