देशात निर्माण झालेल्या धोकादायक व्यवस्थेला संपविण्यासाठी सगळ्यांना संघटित होण्याची गरज : आमदार नाना पटोले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : देशात आज निर्माण झालेल्या मानवी जीवनासाठी धोकादायक व्यवस्थेला संपवायचे असेल तर समाजातील सर्व घटकांनी संघटित होऊन प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. नागरिकांचे हित व कल्याणकारी व्यवस्था स्थापित करण्यासाठी धार्मिक व सांस्कृतिक व्यासपीठावरून समाजात जनजागृती निर्माण करण्याची वेळ आली आहे. स्थानिक समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात सृष्टी नेचर क्लबच्या वतीने आयोजित रावण दहन , नवरात्री व दसरा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात उपरोक्त प्रतिपादन करतांना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार नाना पटोले नी वरील प्रतिपादन केले. पटोले म्हणाले की सध्याच्या परिस्थितीत निसगार्चा समतोल शेतकरी हिताचा नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मी दुर्गा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो की निसर्गदेवाने शेतकºयाला साथ देत शेतकरयांनी आत्महत्ये पासून परावृत्त व्हावे व शेतकºयांची सर्व समावेशक प्रगती व्हावी हीच मनोकामना या प्रसंगी व्यक्त केली. खासदार सुनील मेंढे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की सृष्टी नेचर क्लबच्या वतीने आयोजित हा महोत्सव जिल्यातच नव्हे तर पूर्व विदर्भात उल्लेखनीय असून समाजातील लुप्त प्रतिभांना एक उत्कृष्ट व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे ही बाब भंडारा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.

सृष्टी नेचर क्लबच्या वतीने आयोजित नवरात्र व दसरा महोत्सवात हजारोच्या संख्येत उपस्थित असलेल्या जनसमुदाय समक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले खासदार सुनील मेंढे ,माजी मंत्री विधान परिषद सदस्य डॉक्टर परिणय फुके, सौ.परिणीता फुके, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील, पोलीस अधीक्षक लोहित मतानी, माजी आमदार सेवक वाघाये, सरोज वाघाये, बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे ,सौ सरिता फुंडे, महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये, जि प सदस्या मनीषा निंबार्ते, डॉक्टर चंद्रकांत निंबार्ते, डॉक्टर गिरीश व्यास, डॉक्टर दुर्गेश चोले, तहसीलदार महेश शितोळे, थानेदार मिलिंद तायडे व गणमान्य नागरिकांनी महोत्सवात मोठ्या संख्येने हजेरी लावली. आयोजित महोत्सवात सामूहिक गरबा स्पर्धेत प्रथम क्रमांक भंडाराच्या माऊली गटाला ५१ हजार रुपये , द्वितीय क्रमांक स्टार ग्रुप सडक अजुर्नीला रु.३१ हजार , तर तृतीय क्रमांक जय मातादी ग्रुप गडचिरोलीला २१ हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. नाना पटोले व मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून वितरण करण्यात आले. सृष्टी नेचर क्लबचे अध्यक्ष अर्पित गुप्ता, उपाध्यक्ष प्रशांत खेडीकर, सचिव दत्ता गिरीपुंजे, कोषाध्यक्ष विजय गुरुनानी, सह सचिव परवेज आकबानी ,सदस्य कांचन कावळे, निशिकांत वैद्य, संदीप भिवगडे, श्रीकांत सपाटे, दीपक देशमुख ,मोहन निर्वाण, भोला सचदेव ,संकेत खेडेकर महेश गुरुनानी इत्यादींच्या अथक परिश्रमाने नवरात्र व दशहरा महोत्सव स्पर्धात्मक व मनमोहक कार्यक्रमासह यशस्वीपणे साजरा करण्यात आला. महोत्सवाचे संचालन व आभार प्रदर्शन अक्षय मसुरकर यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *