बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरु ठार

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : नजिकच्या झबाळा येथील फार्महाऊस मधील गोठ्यात बांधलेल्या गायीच्या वासरांवर बिबट्याने हल्ला करुन दोन वासरांना ठार केले तर दोन वासरु गंभीर जखमी केल्याची घटना १५ मे व १६ मेच्या रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान असे सलग दोन दिवस बिबट्याने हल्ला केला. यामुळे परीसरात बिबट्याची दहशत पसरली असून दिवसाही शेतकरी शेतात जायला घाबरत आहेत. शेतक-यांनी शेतात उन्हाळी धानपिक लावल्याने आता बिबट्याचे संकट ओढवल्याने शेतात जायचे कसे? हा प्रश्न शेतक-यांना पडला असून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. भंडारा जिल्ह्यात वन्यप्राण्यांसह हिंस्र प्राण्यांनी धुमाकूळ घालून शेतकरी पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे.

भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार, झबाडा, टेकेपार, सिरसघाट व सिल्ली परिसरात बिबट्याने मागील पाच सहा दिवसांपासून धुमाकूळ घालून दोन दिवसात दोन शेतक-यांच्या चार जनावरांचा फडसा पाडला. यात दोन वासरांचा मृत्यू झाला तर दोन वासरू गंभीररित्या जखमी झाले आहेत. यात मानेगाव येथील रहिवासी पप्पू रुपचंद कांबळे यांच्या झबाळा येथील फार्महाऊसवरील गोठ्यातील गायींच्या दोन लहान वासरांवर १५ मे रोजी रात्री ९ वाजता बिबट्याने हल्ला करुन एक वासरु (गोरा) ठार केला तर दुसरा जखमी केला. १६ मे रोजी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान झबाडा येथील रहिवासी गोवर्धन झिबल डोरले यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या दोन वासरांवरबिबट्याने हल्ला करुन यातील एका वासराला ठार केले तर दुसºयाला गंभीरस्वरुपाने जखमी केले.

मागील चार दिवसापासुन या परिसरात बिबट्याची दहशत कायम असून नागरिक धास्तावले आहेत. सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असता वनपरीक्षेत्रधिकारी विवेक राजुरकर यांच्या मार्गदशनात बिटरक्षक श्रीराम, वनरक्षक नडंगे यांनी १६ मे रोजी घटनास्थळाची चौकशी केल्यावर त्यांना बिबट्याचे पगमार्क दिसल्याने त्यांनी वनविभागाकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावले. दरम्यान दि. १६ मे रोजी रात्री १०.३० वाजता दरम्यान शिकार केल्यानंतर पुन्हा बिबट आल्याचे कैद झाले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला आहे.

भंडारा तालुक्यातील सिल्ली परीसरातीलमानेगाव बाजार, आंबाडी, झबाडा, मकरधोकडा, तिड्डी, गराडा, बासोरा, जाख, टेकेपार, सिरसघाट अशा अनेक गावात या वर्षी रब्बी हंगामातील उन्हाळी धानाची लागवड केली आहे. सद्या धान कापणी व मळणीच्या कामाला वेग आला असतांना मागील पाच सहा दिवसांपासून मानेगाव बा. परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या परिसरात बिबट्याचे बस्तान असून दि. १५ मे रोजी कांबळे यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला चढवून ठार केले. तर गोठ्याबाहेर असलेल्या कुत्र्यावर झडप घालून त्यालाही ठार केले. दि. १६ मे रोजी रात्री ९.३० वाजता दरम्यान गोवर्धन झिबल डोरले यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर बिबट्याने हल्ला चढवून दोन वासरांचा फडसा पाडला. घडलेला प्रकार १६ मे रोजी सकाळी उघडकीस येताच याची माहिती भंडारा वनविभागाला देण्यात आली.

वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजुरकर, बिटरक्षक श्रीरामे, नरडंगे, उकडे, अनिल शेळके, तसेच कारधा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नवखरे यांनी आपल्या ताμयासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. हटवार यांनी सुध्दा घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वनविभागाने घटनेचा पंचनामा केला. पंचनामा करतेवेळी नरेश येवले, पो.पा. नेपाल डोरले, सरपंच सविता डोरले, मोहन ठाकरे, किशोर हरडे, किशोर बावणकुळे व गावकरी उपस्थित होते. वनविभांगाने सीसीटीव्ही कॅमेरा घटनास्थळी लावण्यात आला. रात्री ९.३० वाजता २ वासरांची शिकार केल्यानंतर रात्री १०.२२ वाजता दरम्यान बिबट पुन्हा त्या ठिकाणी आल्याचे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला.

बिबट्याला जेरबंद करण्याकरीता वनविभागाकडून उपाययोजना केल्या जात असल्याचे वनअधिका-यांकडून सांगितले जात आहे. बिबट्याच्या दहशतीने नागरिक धास्तावला असून ऐन उन्हाळी धान कापणीच्या हंगामात बिबट्याने धुमाकूळ घातल्याने हंगाम प्रभावित होण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविली जात आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे सायंकाळ होताच नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नाही, तर रस्ते सामसूम होत आहेत. वनविभागा ने नुकसानग्रस्त पशुपालकांना आर्थिक मोबदला देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *