जुन्या वादातून युवकाची हत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : जुन्या वादातून बापलेकांनी एका युकास मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील भूराटोला येथे १८ मे रोजी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. गुरुदास माणिकचंद रहांगडाले (२८) रा. भुराटोला असे मृतक युवकाचे नाव आहे. गतवर्षी गुरुदास यांची जनावरे आरोपींच्या शेतात गेली होती. यावरून त्यांच्यात वाद झाला होता. याचा राग म्हणून गुरुवारी आरोपी व गुरुदास यांच्यात भांडण झाले.

भांडणाचे रूपांतर मारहाणीत झाले. दरम्यान गुरुदास हा गंभीर जखमी झाला. सदर घटना कुटुंबीयांना कळताच त्यांनी जखमी गुरूदासला येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले, येथे प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्यानेगोंदिया येथे पाठविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान गुरूदासचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी चंद्रकुमार तुंबळे याला अटक करण्यात आली असून इतर दोघेजण फरार असल्याने सांगितले जाते. तिरोडा पोलिसांनी भादवि कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.