भीमनगरात धारदार शस्त्राने युवकाचा खून

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : डोळ्यात मिरची पावडर टाकत मारेकºयांनी एका युवकाचा धारदार शस्त्राने भोसकून खून केला. ही घटना शुक्रवारी (ता. १९) सकाळी सहाच्या सुमारास येथील भीमनगरात घडली. पंकज मेश्राम (वय ३२, रा. भीमनगर) असे मृताचे नाव आहे. पंकज मेश्राम हा घरी झोपेत असताना मारेकरी सकाळी सकाळी ६ वाजता आले व मारेकºयांनी त्याच्या घराचे दार ठोकले असता मृतकाने दार उघडताच मारेकºयांनी डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर धारदार शस्त्राने भोसकून त्याचा खून केला. घटनेनंतर मारेकरी फरार झाले असून, पोलीसांना माहिती मिळताच गोंदिया शहर पोलिस घटनस्थळी येऊन मृतदेह शविच्छेदनाकरिता पाठवण्यात आले, व पुढील तपास शहर पोलिस करत असून फरार आरोपींचा शोध पोलिस करत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *