रस्ता दुरुस्तीसाठी रोखला भंडारा- रामटेक महामार्ग

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मोहाडी तालुका अंतर्गत येणा-या पाहुणी येथील मुख्य रस्त्याचे तत्काळ बांधकाम करावे, या मागणीला घेऊन ग्रामस्थांनी भंडारा- रामटेक मार्गावरील पाहुणी बसस्थानकासमोर महामार्ग रोखून धरला. यामुळे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनानुसार पाहुणी हे गाव भंडारा-रामटेक मार्गावरून दीड किलोमीटर आत आहे. मागील पाच वर्षापुर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. गावातील मुख्य रस्ता भोसा, टाकळी, खमारी नेरी इत्यादी गावांना जोडणारा आहे.

पाहुणी येथे गत दोन वर्षांपासून मुख्य रस्ता अतिशय खराब अवस्थेत आहे. त्यामुळे विद्यार्थी, नागरिकव बाहेरुन येणा-यांनाही रहदारीसाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात तर चिखल तुडवीत प्रवास करावा लागतो. त्यातल्या त्यात मोठ्या खाड्याने अपघाताची शक्यताही बळावली आहे. एप्रिल महिन्यात आलेल्या अवकाळी पावसाने तर प्रचंड त्रास उद्भवला. मागील वर्षभरापासून या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. परंतु बांधकाम दखल घेतली नाही. परीणामी पाहुणी ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. अल्टिमेटम देऊनही प्रशासन काहीच करत नाल्याने सोमवारी महामार्ग रोखून धरण्यात आला. या आंदोलनामध्ये महिलांची व युवकांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी दोन्हीकडे वाहतुक काही काळासाठी ठप्प झाली होती. एखदी मोठी दुर्घटना झाल्यावर प्रशासनाला जाग येईल काय? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. आंदोलनात सरपंच हरिभाऊ धुर्वे, उपसरपंच रणजीत सेलोकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *