धान चोरी प्रकरणात तिघांना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यॉर्डात ठेवलेले धानाचे ४० पोते चोरी करणाºया तीन आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त केलेले धान मूळ मालकाला परत करण्यात आले. गौतमनगर येथील संजय गणवीर यांचेधानाच्या विविध वाणाचे धान बाजार समितीच्या यॉर्डात विक्रीसाठी ठेवले होते. दरम्यान १४मार्च रोजी ते अज्ञात व्यक्तींनी यातील धानाचे ४० पोते चोरी केली. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी राजकुमार शिवशंकर विश्वकर्मा (२९) संदीप सदाराम बावणथडे (२८) व अतुल संतोष पारधी (२२) सर्व रा. सावराटोली यांना ताब्यात घेतले व चोरी केलेले धान जप्त केले. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त केलेले धान संजय गणवीर यांना परत करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *