इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी सुविधांच्या विकासाबद्दल महावितरणला सर्वोत्कृष्ट पुरस्कार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : ‘ईव्ही चार्ज इंडिया २०२३’ या नवी दिल्ली येथे आयोजित इलेक्ट्रिक वाहनांविषयीच्या परिषदेत बुधवारी महावितरणला चार्जिंगसाठी पायाभूत सुविधांच्या विकासात सर्वोत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या यशाबद्दल कंपनीच्या अधिकारी व कर्मचा-यांचे अभिनंदन केले. सोसायटी आॅफ मॅन्युफॅक्चरर्स आॅफ इलेक्ट्रिक व्हेईकल्स (एसएमईव्ही) या संस्थेचे महासचिव अजय शर्मा यांच्या हस्ते प्रसाद रेशमे यांनी महावितरणतर्फे पुरस्कार स्वीकारला. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन व विजय सिंघल यांच्या नेतृत्वात महा-वितरणने इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगबाबत कामगिरी केली, असे मा. प्रसाद रेशमे यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितले.

राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी महावितरणला राज्याची नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महावितरणच्या पुढाकाराने राज्यात एकूण ३२१४ चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आलीआहेत. महावितरणने राज्यात स्वत:ची ६२ विद्युत वाहने चार्जिंग स्टेशन्स उभारली आहेत. पुण्यात २३, ठाण्यात ११, नवी मुंबईत १२, नागपूरमध्ये ६ यासह नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आणि सांगली या शहरात ही स्टेशन उभारण्यात आली आहेत. या स्टेशन्सवर चार्जिंग करणाºया वाहनांची संख्या गेल्या सप्टेंबरपासून सातत्याने वाढत आहे. महावितरणने इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी स्टेशन उभारायचे असेल तर त्यासाठी स्वतंत्र वेबसाईट सुरू केली आहे. तसेच महावितरणच्या पॉवरअप ईव्ही या अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून वाहनचालक आपल्या जवळचे चार्जिंग स्टेशन शोधू शकतात तसेच वाहनाच्या चार्जिंगसाठी या मोबाईल अ‍ॅपचा वापर करू शकतात.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *