वारकºयांवर लाठीहल्ल्याची घटना अत्यंत संतापजनक – नाना पटोले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असलेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या वारकरी संप्रदायाच्या आषाढी वारीला गालबोट लावण्याचे पाप राज्य सरकारच्या पोलिसांनी केले आहे. शांततेत पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकºयांवर लाठीमार करण्यापर्यंत शिंदे-फडणवीसांच्या मुजोर पोलिसांची मजल गेली आहे. वारकºयांवर लाठीमार करणाºया मुजोर पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. अलंकापुरीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा होत असताना पोलिसांनी वारकºयांवर केलेल्या लाठीमाराचा तीव्र निषेध करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विठुरायाचा घोर अपमान करण्याचा प्रकार आहे.

असा प्रकार होऊच कसा शकतो? वषार्नुवर्षे चालत असलेल्या या पंरपरेला गालबोट लावण्याचे पाप करण्याचे धाडस पोलीस कसे काय करु शकतात? पोलीसांना कोणी अधिकार दिला वारकºयांवर लाठीमार करण्याचा? पोलीस कोण आहेत वारकºयांच्या हक्कात बाधा आणणारे ? वारीचे नियोजन करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. गृहमंत्री म्हणून फडणवीस नापास झाले आहेत तरीही त्यांना खुर्ची सोडवत नाही पण त्यांच्या खुर्चीच्या मोहात पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासला जात आहे. मागील तीन महिन्यात १० ठिकाणी दंगली झाल्या.

हिंदू संघटनांच्या नावाखाली काही लोक जाणीवपूर्वक विखार पसरवत आहेत पण शिंदे सरकार व या सरकारमधील गृहमंत्री फडणवीसांना ते दिसत नाही. यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली. पटोले म्हणाले की, शिंदेफडणवीस सरकार हे महाराष्ट्राला लागलेले ग्रहण आहे. या राज्यात दररोज गुन्हे घडत आहेत पण गृहमंत्रीपदावरील व्यक्तीला त्याची जरीही चाड नाही. वारकºयांवरील लाठीहल्ला हा शांततेने पंढरपूरकडे प्रस्थान करणाºया भक्तांचा वशिंदे- फडणवीसांचे पोलीस फक्त विरोधकांवर कारवाया करण्यात तत्पर आहेत.

गुन्हेगार, दंगेखोर, बलात्कारी यांच्यावर कारवाई करताना फडणवीसांच्या हाताला लकवा मारतो काय? असा संतप्त सवाल पटोले यांनी केला आहे. विरोधी पक्षाने राज्यातील एखादा गंभीर मुद्दा उपस्थित केला तार त्याची खिल्ली उडवणे एवढेच गृहमंत्री फडणवीस यांचे काम आहे. फडणवीस यांना पोलीस दलातील अधिकारी जुमानत नाहीत असे दिसते. अशा गृहमंत्र्यांनी पदावर राहणे महाराष्ट्रासाठी गंभीर आहे. वारकरी बांधवांवर केलेला पोलीस लाठीहल्ला हा महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारा आहे. हे सरकार केवळ बोलघेवड्यांचे आहे, कृती यांच्या हातून होतच नाही. महाराष्ट्रातील या बेकायदेशीर पापी सरकारला जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असेही पटोले म्हणाले.

वारीतील प्रत्येक दिंडीला सरकारने ५० हजार रुपये द्यावे : नाना पटोले पंढरपूरची आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या वारीसाठी दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत जात असतात. वारीमार्गाच्या या प्रवासात भजन, किर्तन, प्रवचन, भारुडांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीचे कार्यही होत असते. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने वारीतील दिंड्यांच्या माध्यमातून होत असलेल्या या सामाजिक कार्यांची दखल घेऊन त्यांच्या निधीतून प्रत्येक दिंडीला ५० हजार रुपये द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणीच्या भेटीची आस घेऊन दरवर्षी वारी निघते. पंढरपूर वारीची ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. जात, धर्म, पंथ असा कोणताच भेदभाव नसलेली समाजासमोर एक आदर्श निर्माण घालून देणारी ही वारी पंरपरा आहे. दरवर्षी जगतगुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताई, निवृत्तीनाथ, सोपानदेव, संत गजानन महाराज यांच्या पालख्यांसह इतर पालख्या पंढरपूरकडे जात असतात. या पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने अबाल-वृद्ध भक्तीरसात तल्लीन होत असतात. वारीमध्ये भक्तीरसाबरोबर समाजप्रबोधनाचे महत्वाचे कार्य होत असते. समाजाला लागलेली अंधश्रद्धा व व्यसनाची कीड समूळ नष्ट करण्याचे काम या दिंड्यांच्या माध्यमातून होत असते. महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मुलनाचा कायदाही केलेला आहे. व्यसमुक्तीसाठीही सरकारी पातळीवर प्रयत्न केले जातात पण हे काम केवळ कायद्याच्या माध्यमातून होत नाही त्याला समाजप्रबोधनाची जोडही असावे लागते, तेच काम वारीतील दिंड्या करत आहेत. आषाढी वारीचे औचित्य साधून व्यसमुक्ती दिंडी काढून विविध ठिकाणी प्रचार व प्रसार केला जातो. विठुनामाच्या गजरात व्यसनमुक्ती व अंद्धश्रद्धा निर्मूलनाचे मोठे सामाजिक कार्य होत असते. राज्य सरकारने या कार्याची दखल घेऊन प्रत्येक दिंडीला ५० हजार देऊन त्यांच्या कार्यार्ला प्रोत्साहन देण्यासाठी द्यावे असे पटोले म्हणाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *