मान्सूनच्या मोसमात उष्णतेची लाट

 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : हवामानातील बदलांचा वेग गेल्या काही वर्षात वाढला असला तरीही यावर्षी हे बदल अधिक तीव्र झाले आहेत. भर उन्हाळ्यात वादळीवारे आणि गारपिटीसह झालेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर मान्सूनची वेळ असताना तापलेले उन्ह, यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. लवकर येणार म्हणत असतानाच मान्सूनचे आगमन भारतात उशीरा झाले आणि महाराष्ट्राची वेस ओलांडलेला मान्सून या वेशीवरच अडकला आहे. २४ जूनला मान्सून पुण्यात प्रवेश करेल आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल. तर २६ जूनपासून पुण्यात पावसाचा जोर वाढेल, असा नवा अंदाज हवामान खात्याने दिला विदर्भासह छत्तीसगढ, झारखंड, ओडिशा, तेलंगणा या देशातील काही भागांमध्येही आणखी काही दिवस उष्णतेचे प्रमाण वाढलेले असेल. आज आणि उद्या राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळू शकते.

गुजरातच्याही काही भागांमध्ये तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. यंदा ऐन मान्सूनच्या मोसमात उष्णतेची लाट असल्याने हवामान खात्याने ‘येलो’ व ‘आॅरेंज’ अलर्ट दिला आहे. दक्षिण भारतात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज दिला आहे. तर देशाच्या उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आहे. तर इकडे विदर्भात उष्णतेचा जम्मू-काश्मिर भागात पावसाची दाह काही कमी होण्याचे नावच घेत नाही. महाराष्ट्रातील हजेरी व बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.