देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण हे उत्कृष्ट साधन- कुर्तकोटी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : इतरांपेक्षा मुख्याध्यापकांना अधिक ज्ञान असंल पाहिजे. दुसºयांवर सहज जाणवेल असे प्रभुत्व निर्माण करा. वाचनाने शब्दसंपदा वाढते. मूल्य विकसित करण्यासाठी वाचन आवश्यक आहे. देश, मनुष्य, कुटुंब आदींची प्रगती करण्यासाठी शिक्षक हे उत्कृष्ट साधन आहे. शिक्षणात जीवन बदल करण्याची शक्ती आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद भंडाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी केले. रॉयल पब्लिक स्कूल भंडारा येथील सभागृहात भंडारा जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापकांची ‘योजनांचा जागर’ या विषयावर सभा शिक्षण विभाग (माध्यमिक ) यांच्या मार्फत आयोजीत करण्यात आली होती.

त्यावेळी ते बोलत होते. सभेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून केले. मंचावर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लिकर, शिक्षणाधिकारी (योजना ) रवींद्र सोनटक्के, रॉयल एज्युकेशन सोसायटीचे सचिव मधु सॅमुअल, अधिक्षक रवींद्र सलामे, मुख्याध्यापक संघाचे सचिव राजू बांते, गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड, गटशिक्षणाधिकारी भिवगडे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विजय आदमने, तुमसरगटशिक्षणाधिकारी अर्चना माटे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना मुख्यकार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी, दर्जा व योग्यता दिसत नसते. ती प्रोजेक्ट करावी लागते असे सांगून विरोधाला मान्य व त्याचा सन्मान करायला शिकायला हवे असे ते म्हणाले. शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी विविध योजनांची माहिती देवून स्पर्धा परीक्षेची बीज आतापासून पेरा. शिष्यवृत्ती परीक्षा माईलस्टोन आहे. शाळेत विविध उपक्रम राबवा. ते उपक्रम इतरांना सांगा व माध्यमाद्वारे प्रसारित करा. शिक्षणाधिकारी संजय डोर्लिकर यांनी माध्यमिक विभागातील योजनांची माहिती दिली.

तसेच नवीन शैक्षणिक सत्रात मुख्याध्यापकांना कोणती कामे महत्वाची आहेत याची माहिती दिली. विज्ञान पर्यवेक्ष्- ाक नितीन वाघमारे यांनी, इन्स्पायर अवार्ड व अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेची माहिती दिली. प्रस्ताविक पंचायत समिती भंडाराचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी केले. संचालन विस्तार अधिकारी शिल्पा निखाडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक संघाचे सचिव राजू बांते यांनी मानले. सभेला प्रामुख्याने उपशिक्षणाधिकारी विनायक वंजारी, लांडे, स्काऊट गाईडचे मार्गदर्शक रंभाड तज्ञमार्गदर्शक प्रमोद सेलोकर, गट शिक्षणाधिकारी मारोतराव कोरे, सुभाष बावनकुळे, केंद्रप्रमुख गिरीधारी भोयर, वसंत साठवणे, भीमराव मेश्राम, सुधाकर कंकलवार, पुष्पलता भोयर, सुजाता रामटेके उपस्थीत होते. तर विशेष शिक्षिका गडपाल, तिरपुडे, धांडे, नेपाले, देशमुख, राकेश गजभिये यांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *