राज्यातील पहिल्या पाचमध्ये अर्जुनी मोरगाव पोलिस ठाणे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : सन २०१६6 मध्ये झालेल्या डीजीएसपी व आयजीएसपी कॉन्फरन्समध्ये निकोप स्पर्धा वाढावी, कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, दोषसिध्दी यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी देशपातळीवर १० सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची म्हणून निवड करण्याचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला होता. त्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची निवड भारत सरकारच्या गृहमंत्रालयाकडून करण्यात आली. यात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पोलिस ठाणे हे राज्यातील पाचमध्ये सर्वोत्कृष्ठ पोलिस ठाणे ठरले आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस ठाण्यांचा विचार करून देशपातळीवर सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलिस ठाण्यांचा समावेश होण्याच्या दृष्टीने, तसेच राज्यातील पोलिस ठाण्यांची अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहित करणे आदी उद्देश साध्य करण्यासाठी सन २०२० या वर्षापासून राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट ५ पोलिस ठाण्यांची निवड करुन सदर पोलीस ठाण्यांना सन्मानचिन्ह व रोख बक्षिस प्रदान करण्यात येते.

यातंर्गत २०२१ या वर्षातील कार्यमुल्यांकनाच्या बाबतीत राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे स्पर्धेकरीता निश्चित करून दिलेले गुणांकन, निकष व नियमावली आदींचे मूल्यमापन करून २०२१ या वर्षातील कार्यमुल्यांकनाच्या बाबतीत परिक्षेत्र निहाय व आयुक्तालय निहाय प्राप्त उत्कृष्ट पोलिस ठाण्यांमधून सर्वोत्कृष्ट ५ पोलिस ठाण्यांची शिफारस राज्य स्तरावरील समितीने केली होती. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील ५ पोलिस स्टेशनची निवड करण्यात आली आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्याची निवड झाली आहे. याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलिस ठाणे, नांदेड जिल्ह्यातील देगलूर, छत्रपती संभाजीनगरचे वाळुंज व ठाणे शहरचे राबोडी पोलिस ठाण्यांचा सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून राज्य स्तरावरील समितीने घोषीत केले आहे. गोंदिया जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांनी अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, गुणवत्ता वाढविणे दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हयाचा तपास, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने संबंधित पोलिस

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *