पत्रकाराला मारहाण करणाºया आरोपीला अटक करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : कोविड कालावधीत उत्पादन शुल्क विभागाने कंबोज बारमध्ये कारवाई केली होती. त्या कारवाईची बातमी का लावली? असे आता दोन वर्षांनी विचारून कंबोज बारच्या मालकाने पत्रकार प्रतिक तांबोळी यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपीविरूद्ध पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे, या आशयाचे निवेदन व्हाईस आॅफ मीडिया पत्रकार संघटनेने जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन दिले. महाराष्ट्र टाईम्स आॅनलाईनचे जिल्हा प्रतिनिधी प्रतिक तांबोळी हे गुरूवार, दि. १३ जुलैच्या रात्री ११ वाजता नागपूर मार्गावर थांबले असताना संजय कंबोज यांचा पुतण्या त्यांच्याजवळ येऊन बातमी लावणारा तुच होता ना, असे म्हणत कॉलर पकडली. तितक्यात संजय कंबोज तिथे येऊन त्यांनी मारहाण केली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी तांबोळी यांनी रात्रीच भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर शुक्रवारला जिल्हा सामान्य रूग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात त्यांना गंभीर दुखापत असल्याचे दिसून आले आहे. त्यावरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, पत्रकारांवर वाढते हल्ले ही दुर्दैवी घटना आहे. राज्यात पत्रकारांवर हल्ले करण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. त्यामुळे अशा प्रकरणात पत्रकार संरक्षण अधीनियमान्वये आरोपींविरूद्ध दखलपात्र गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा व्हावी आणि या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संघटनेने केली आहे. यावेळी व्हाईस आॅफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परसावार, कार्याध्यक्ष राजू मस्के, उपाध्यक्ष समशेर खान, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष चेतन भैरम, सचिव मिलींद हळवे, उपाध्यक्ष राकेश चेटूले, प्रा.नदीम खान, दीपेंद्र गोस्वामी, काशिनाथ ढोमणे, अजय मेश्राम, प्रतिक तांबोळी, विलास सुदामे, शुभम देशमुख, चंद्रकांत श्रीकोंडवार, विजय क्षीरसागर, मुकेश मेश्राम, बाबा बाच्छील, सचिन मेश्राम, दिलीप देशमुख यांच्यासह पत्रकारबांधव उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *