खराब रस्त्यामुळे एसटी बस उतरली रस्त्याखाली १५ प्रवासी थोडक्यात बचावले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा आगाराची तिरोडा ते धापेवाडा मार्गे गोंदिया कडे जात असलेली एसटी बस खराब रस्त्यामुळे रस्त्याचे खाली उतरल्याने पंधरा प्रवासी व चालक वाहक थोडक्यात बचावले. या प्रकारामुळे येथील मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. तिरोडा खैरलांजी मार्गावरील रेल्वेवर उडाण पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे तिरोडा खैरलांजी मार्गाची वाहतूक स्टेशन मार्ग तिरोडा तहसील कार्यालय चिरेखणी मार्गे वळविण्यात आली असून खराब रस्ता असल्यामुळे या रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण करण्यात आले होते.

मात्र २४ तास या रस्त्यावरून वाळू वाहून नेणारे अवजड वाहने धावत असल्यामुळे रस्ता तयार करून महिनाही झाला नसताना या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली. रस्ता अरुंद असून दोन्ही बाजूला शेती असल्याने एकाच वेळी दोन वाहने जाण्यास अडचण होत असुन वाहने रस्त्याखाली उतरतात. या रस्त्यावरुन मातीमुळे वाहने घसरत असून आज दि. १४ जुलै रोजी या मार्गावर आधीच दोन टिप्पर फसले असताना दुपारी १.४५ वाजता तिरोडा आगाराची बस क्रमांक एमएच ४० एन ८५६३ तिरोडा येथून धापेवाडा मार्गे गोंदियाकडे जाण्यास चालक देवदास मेश्राम, वाहक लोकेश कुंभलकर १५ प्रवाशांना घेऊन निघाली असता ही बस चिरेखणीकडे जात असता समोरून येणारे वाहणास जागा देतांना रस्त्यावरून घसरली. मात्र बसचे चालक देवदास मेश्राम यांच्या सतर्कतेने वाहक व बसमधील १५ प्रवासी चालकाच्या समयसुचकतेने थोडक्यात बचावले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *