सेल्फीच्या नादात चार युवक बुडाले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागभीड : ‘सेल्फी’ काढण्याच्या नादात घोडाझरी तलावात वरोडा तालुक्यातील शेगावचे चार युवक बुडाल्याची धक्कादायक घटना रविवार, १६ जून रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. मनीष श्रीरामे (२६), धीरज झाडे (२७), संकेत मोडक (२५), चेतन मांदाडे (१७, रा. सर्व शेगाव, ता. वरोडा) अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत. जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने घोडाझरी तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक येथे गर्दी करीत आहेत.

दरम्यान, रविवारी शेगाव येथील ८ मित्र घोडाझरी तलाव येथे आले होते. यावेळी नागभीड पाणी पुरवठ्याच्या विहिरीलगत ह्यसेल्फीह्ण काढण्याच्या नादात त्यापैकी एक युवक पाय घसरून तलावात पडला. त्याला वाचविण्यासाठी गेलेले अन्य तीन युवकही पाठोपाठ तलावात बुडले. घटनेची माहिती कळताच पोलिस, घोडाझरी प्रकल्पाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बोटीद्वारे तलावात शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, वृत्तलिहेपर्यंत बुडालेल्या युवकांचा शोध लागला नव्हता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *