उमरेड-पवनी-कºहांडला विस्तारित अभयारण्यातील आठ गावांचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : उमरेड-पवनी-कºहांडला विस्तारित वन्यजीव अभयारण्यातील आठ गावांच्या पुनर्वसनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.मागील १० वर्षांपासून हा प्रश्न राज्य सरकार आणि वनमंत्रालयाकडे प्रलंबित होता. वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतातील पिके घरी आणता येत नव्हते, रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली होती,गरीब विद्याथ्यार्ना बाहेर गावी शिक्षणासाठी पायदळ किंवा सायकलने जाता येत नव्हते प्राण्यांच्या भीतीने अनेक विद्यार्थ्यांना मध्येच शाळा सोडावी लागली. गावकºयांची सुरक्षाही धोक्यात आली होती.ही समस्या सोडवण्यासाठी २०१७ ला गावकºयांनी भाजपा पवनी तालुक्याचे माजी अध्यक्ष अरुण आसई व भाजपचे कार्यकर्ते आनंद माहूरे यांचे नेतृत्वात माजी खासदार मा शिशुपालजी पटले यांची भेट घेतली. माजी खा.पटले यांनी पुनर्वसन ग्रस्त पाऊनगावची प्रत्येक्ष भेट घेतली असता वरील विदारक समस्यांचा अंबार त्यांचे समोर उभा होता.

या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाकडे पाठपुरावा सुरू केला अनेक बैठकांच्या फेºया सुरू ठेवल्या. शेवटी दि.५ डिसें.२०१८ ला तत्कालीन मुख्यमंत्री मा देवेंद्रजीफडणवीस यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या १४ व्या बैठकीत या आठ गावांच्या पुनर्वसणाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती.लगेच गॅजेट नोटिफिकेशन साठी प्रस्ताव पाठविण्यात आला याला जास्तीत जास्त दोन महिन्याचा कालावधी लागणार होता.परंतु २०१९ ची विधानसभा निवडणूक आचारसंहिता व कोरोना लॉकडाऊन यामध्ये अडीच वर्षे वाया गेली. माजी खासदार शिशुपाल पटले यांचे सततच्या पाठपुराव्यामुळे व आमदार नरेन्द्र भोंडेकर यांचे सहकार्याने अखेर दि.४ जुलै ला राज्य शासनाने गॅजेट नोटि फिकेशन जाहीर केले. सदर विस्तारित वन्यजीव अभयारण्यात पुनर्वसनासाठी पाहुनगाव, चीचखेडा,कवडसी, गायडोंगरी, जोगीखेडा, आवडगाव, धामणगाव व हमेशा ह्या महसूल गावांचा समावेश आहे.या गावांच्या क्षेत्रातील अधिकाराचे अस्तित्व, स्वरूप व व्याप्ती यांची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी म्हणूनउपविभागीय अधिकारी भंडारा यांची नियुक्ति करण्यात आली आहे.

पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी पालकमंत्री डॉ परिनय फुके, वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ही गावकºयांनी आभार मानले आहे. मात्र या कामी मागील ६ वर्षांपासून सतत पाठपुरावा करून आपल्या अथक प्रयत्नाने या आठ गावांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा करून दिल्याबद्दल गावकºयांनी माजी खासदार मा. शिशुपालजी पटले यांची प्रत्येक्ष भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले आहे. यावेळी सर्व अरुण आसई, नरेशजी कुरुदकर,रमेश बोरकर, आनंद माहुरे,विठ्ठल कुरुदकर,इंद्रापाल मेश्राम,अमोल कुरुडकर,आनंदराव कुरुदकर, प्रकाश मेश्राम,रवीद्र माहुरे, फकिर कुरुडकर, देवराम माल्हेर, अरुण लोहारे, महेंद्र डडमल, महेंद्र नारनवरे, जागेश्वर शनिवारे,संतोष कलसार,दिलीप गणवीर,प्रकाश कांबळे, मोतीराम लुचे,एकनाथ फोपसे, रामकृष्ण चौधरी,प स सदस्य बाळकृष्ण गाढवे, मातीन शेख, राजकुमार मरठे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *