जिल्ह्यात दोन लक्ष ५६ हजार शेतकºयांनी भरला पिक विमा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : केवळ एक रुपया पिक विमा देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने शेतकºयांसाठी घेतला आहे. या योजनेअंतर्गत काल ३ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील एकूण दोन लाख ५६हजार शेतकºयांनी पीक विमा काढला आहे. ३१ जुलै ही पिक विमा काढण्याची शेवटची तारीख असताना त्यात काही आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे केंद्र शासनाने ही तारीख वाढवून तीन आॅगस्टपर्यंत केली होती. नैसर्गिक आपत्तीत नुकसान होऊन पिक विमा काढलेल्या शेतकºयांना नुकसान भरपाई पासून वंचित रहावे लागत होते. त्यामुळे शेतकºयांनी पीक विमा काढण्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष केले होते, ही बाब लक्षात आल्यानंतर राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या अंमलबजावणीचे यंदा पहिलेच वर्ष असून यावर्षी या एक रुपयात शेतकºयांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करून पिक विमा काढण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.

यामध्ये जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सातत्याने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या समन्वयाने सतत आढावा घेऊन याबाबतीत जास्तीत जास्त शेतकºयांना पीक विमा भरण्यासाठी प्रोत्साहित केले परिणामी जिल्ह्यातील ९२ टक्के खातेदार शेतकºयांना आता पीक विम्याचे संरक्षण मिळाले आहे. पिक विमा योजनेत ३१ जुलै अखेरपर्यंत एक लक्ष ४४.४० हजार ९५४ शेतकºयांनी सहभाग घेतला होता . त्यानंतर तीन दिवसाची मुदत वाढ मिळाल्याने ३ आॅगस्ट अखेर २ लक्ष ५६ हजार १९२ अर्जदारांनी या पिक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला आहे .तर गेल्या वर्षी ही संख्या १लक्ष ३३ हजार ५२४ एवढी होती. यावर्षी एकंदर ९२ टक्के खातेदार शेतकºयांनी या पिक विमा योजनेत पीक विमा भरला आहे.यामुळे १२४७७९९९९९ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. कृषी विभाग व अन्य संबंधित यंत्रणांनी केलेल्या कामामुळे आपण यावर्षी 92% पर्यंत चा पर्यंत उद्दिष्ट गाठू शकलो पुढील वर्षी हे उद्दिष्ट शंभर टक्के पर्यंत करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *