स्वातंत्र्यलढ्यात मोहाडीचे काशिनाथ कळंबे शहीद!

इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ आॅगस्ट अर्थात क्रांती दिन! स्वातंत्र्यलढयाची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाºया तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस, पण स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यात दंग असलेल्या आजच्या पिढीसाठी हा दिवस अनोळखी झाला आहे. सर्वाच्या हृदयात क्रांतिवीरांची ती मशाल आठवणीच्या रूपाने धगधगत राहणे अपेक्षित असले तरी ती मशाल केव्हाच विझली आहे. एवढेच काय प्रशासकीय यंत्रणेसाठीही या दिवसाचे महत्त्व आता औपचारिकतेपुरते शिल्लक आहे. आॅगस्ट क्रांती दिनाला आज ८१ वर्ष पूर्ण होत आहेत.९ आॅगस्ट १९४२ रोजी मुंबईत भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी केलेली ह्यछोडो भारतह्णची गर्जना आणि दिलेला ह्यकरेंगे या मरेंगेह्ण हा मंत्र ९ आॅगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता.त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली.देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरुवात झाली.

प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता.ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती.हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता.गांधीजींच्या केलेल्या आवाहनाला संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळाल्याने ब्रिटिशांची धाबे दणाणले.देशातील आंदोलनाची ब्रिटिशांना आदल्या रात्री बातमी मिळाल्याने पहाटे पाच वाजताच महात्मा गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना बिर्ला हाऊसमधून ताब्यात घेण्यात आले.आता प्रत्येकजण पुढारी होईल,असा संदेश यावेळी गांधीजींनी दिला.ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती.या सर्व नेते मंडळींना पुण्यात हलवण्यात आले.चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी,कस्तुरबा गांधी,महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांनाखाली उतरवण्यात आले आणि त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली.मात्र ब्रिटिश सरकारने गुप्तता पाळूनही या घटनेची माहिती वा-याच्या वेगाने पसरली.गांधीजींना पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद यांना अहमदनगरच्याकिल्ल्यात ठेवण्यात आल्याची माहिती पसरली.

नेत्यांची धरपकड झाल्याने शांत होईल, अशी अपेक्षा ब्रिटिशांना होती.मात्र घडले भलतेच.नेत्यांच्या अटकेमुळे आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले. देशभर जागोजागी आंदोलने, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला.सरकारने जमावबंदी लागू केली.पण लोक आता आदेशांना भीक घालत नव्हते.पोलिसांच्या लाठी हल्ल्याला, गोळीबाराला जुमानत नव्हते.जाळपोळ,पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले. देशातील जनतेने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारल्याची परिस्थिती होती. संपूर्ण देश पेटून उठला होता. दंगल, जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्यांची लुटालूट असे प्रकार सुरू होते. ब्रिटिशांकडून दडपशाही सुरू होती.पाहिजे त्याला विनाचौकशी अटक केली जात होती. सारा देश गोंधळलेल्या स्थितीत होता. सरकारने या सर्व प्रकाराला गांधीजींना जबाबदार ठरवले.गांधीजींनी याचा इन्कार केला आणि सरकारच्या निषेधार्थ २१ दिवसांचे उपोषण केले.पण याचवेळी जगभरातील परिस्थितीही बदलत होती.

युद्धाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकत होते.अमेरिका नावाची महासत्ता उदयास येत होती. अमेरिकेच्या मदतीने ब्रिटिशांनी मुसंडी मारली.त्यामुळे दुस-यामहायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला. महायुद्धाच्या आघाडीवर दिलासा मिळाल्याने ब्रि-ि टशांनी सर्व यंत्रणा भारतातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वापरली आणि क्रांतीची तीव्रता हळूहळू कमी झाली. भारतावर दीडशे वर्षे राज्य करणाºया इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी ९ आॅगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. भारत मातेच्या गुलामगिरीतून बलिदान देऊन तिला मुक्त केले. स्वातंत्र्य भारताच्या अनेक पिढ्या त्यांचे हे ऋणफेडू शकणार नाही. ‘मरावे परि किर्ती रुपे उरावे’ हा आदर्श देशाला त्यांनी दिला. मोहाडी ही एक प्राचीन वस्ती विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील उत्तर दिशेला असलेल्या भंडारा-तुमसर राज्य महामार्गावर वसलेली ऐतिहासिक गाव आहे.स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्षपणे भाग घेणारे येथील नागरिक आघाडीवर होते. आज बुधवार दि.९ आॅगस्ट २०२३ क्रांती दिवस. राष्ट्रपिता महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पदस्पर्शाने मोहाडी भूमी पावन झाली आहे. भंडारातुमसर राज्यमार्गावर असलेल्या हुतात्मा स्मारक होते.

भंडारा जिल्हा हा महाराष्ट्राच्या पुर्वेकडील जिल्हा असून १ मे १ ९९९ ला भंडारा जिल्ह्यात सात तालुके आहेत. यापैकी मोहाडी हा एक वैशिष्ट्यपूर्ण तालुका आहे. मोहाडी हे तालुका मुख्यालय समुद्रसपाटीपासून २७० मीटर उंचीवर बसलेले आहे. मोहाडी या स्थळाचे भौगोलिक स्थान २१ अंश १८.९ ८५ उत्तर व ८ ९ अंश ४०६२५ पूर्व असे आहे.भौगोलिकदृष्ट्या मोहाडी हा प्रदेश सपाट आहे. उत्तरेकडील सिमा भागात सातपुडा पर्वतांच्या टे आढळतात. करडी परिसरात की स्वरुपाच्या टेकड्या आढळतात. भंडारा जिल्ह्याच्या ३,८५,३०० हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी ५६,८४२ हेक्टर क्षेत्र मोहाडीला लाभले असून त्यापैकी १२,९ ०० हेक्टर क्षेत्रामध्ये वनक्षेत्र आणि १,४३५ हेक्टर जमिन शेतीखालीअसून २,८६४हेक्टर क्षेत्र पडित आहे. करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. आॅगस्ट १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सूरू झालेले नागरी असहकार आंदोलन होते.८ आॅगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधातस्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.या आंदोलनात मोहाडीचा सक्रिय सहभाग होता. दि.९आगस्ट१९४२ ला महात्मा गांधीजी यांना अटक झाल्याची वार्ता मोह- ाडीतही आली होती.

दुसºया दिवशी पासूनच इंग्रज सत्तेच्या विरोधात मोहाडीत दररोज राष्ट्रीय झेंडा घेवून मिरवणूक निघत होती. शेतसारा देवू नका,सरकारचे कायदे मानू नका,सरकारी कर्मचाºयांना मदत करू नका’आदी घोषणा देत जनजागृती केली जात होती. या आंदोलनात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक होत होती. अशावेळी त्यांच्या परिवाराला धान्य व पैसा लोकसहभागातून पुरविला जात होता. यासाठी ५१ लोकांच्या मदतीचे हात पुढे आले होते. किती लोकांनी धान्य व पैसा दिला ती कागदपत्र पोलिसांनी जाळून टाकले होते. १९४२ आंदोलनात मोहाडीच्या स्वातंत्र सैनिक सखाराम रोकडे, गणपतरावजी तरारे आदी दहा जणांनी कायदेभंग चळवळीचे नेतृत्व केले होते. अटक होत नाही तोपर्यंत सुरूच ठेवावी असा कणखर पवित्रा घेतला गेला होता. १४ आगस्ट १९४२ ला भंडारा, तुमसर येथे पोलीसांनी जनतेवर गोळीबार केला होता.

तुमसर येथे चार जण शहीद झाले होते. त्यांची प्रेतयात्रा निघू नये यासाठी तुमसरला मोठी फौज येणार होती. तुमसर येथे जाण्यासाठी भंडारा येथून येणाºया फौजेला मोहाडी रोखण्यासाठी पूल तोडला, रस्त्यात लाकूड,विटा दगड घालून तो मार्ग पूर्णत: बंद केला होता.बोथलीच्या नाल्यात फौज शिपायांची गाडी रुतली ती पुढे जात नव्हती. इकडे शहिदांची यात्रा थाटात निघाली होती. त्या नंतर रस्ते अडविणाºया कार्यकर्त्यांची अटक सत्र चालले होते.१९४२च्या आंदोलनात किसनलाल डागा, स.ना.रोकडे, सूरजरतन डागा, सहसराम कटकवार, किसनलाल बागडी गणपत तरारे, अब्दुल सत्तार इस्माईल सिद्धीकी, नामदेव श्रीपाद, बाजीराव निखारे, नत्थु मनगटे, हिरा श्रीपाद, दामू डेकाटे, नत्थु आकरे, फत्तू पाटील, मीरगू मोटघरे, रामनाथ कळंबे, नेतराम चूरे आणखी १८ लोकांना अटक केली गेली. यात अनेकांना स्थानबध्द व कारावास झाला होता. १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात मोहाडीचे काशिनाथ कळंबे हे शहीद झाले. असा १९४२ च्या चले जाव आंदोलनात मोहाडीचा सहभाग होता.

मोहाडीतील शहीद झालेले काशिनाथ कळंबे यांचे हुतात्मा स्मारकात नाव कोरले गेले आहे. त्यांच्या स्मृती कायम तेवत राहाव्या यासाठी हुतात्मा स्मारक तयार करण्यात आले. काशिनाथ कळंबे यांनी वयाच्या ३२ व्यावर्षी देशसेवा करीत प्राणाहुती दिली. बरीच वर्ष हे स्मारक दुर्लक्षित राहिले होते.त्याची अवस्था खूप वाईट झाली होती. शहीद स्मारकाच्या भोवतालचा परिसर कचºयाने व्यापला होता. मोहाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने मोहाडी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. तत्कालीन तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार अनिल बावणकर यांनी उपोषणवर बसलेल्या वार्ताहराला निंबु पाणी पाजून उपोषण सोडऊन पाच लाख रुपये दुरुस्तीसाठी दिले होते.

स्मारकाचे सौंदर्याला पूर्ववत करण्यात यावे यासाठी आंदोलन केली गेली. पण शासनाने दखल घेतली नाही. मोहाडी येथील सामाजिक कार्यकर्ता नरेश दिपटे पुढे झाले. त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांना आपली योजना सांगितली त्यानंतर हुतात्मा स्मारक नरेश दिपटे यांना जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी हस्तांतरीत केला. हुतात्मा स्मारकाला स्वनिधीतून पूर्ववत आकार दिला. काही दिवसांनी मोहाडी नगरपंचायतने तो स्मारक हातात घेण्यासाठी धडपड केली.आज तो स्मारक थाटात उभा आहे.या स्मारकात तरुण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. तिथे मोठ्या प्रमाणावर स्पर्धा विषयक पुस्तकांचा संच उपलब्ध करून दिला होता. पण हे चांगले वैभव राजकारणी नेत्यांना खुपले नाही.तिथे एका पक्षाच्या लोकांनी राजकारणाचा अड्डा बनविला. त्यामुळे दान दिलेली पुस्तके तुमसरच्या एका व्यक्तीने परत घेवून गेले.काहींनी पुस्तका घरी नेल्या.

सहा कपाटात असलेली स्पर्धा पुस्तके रिकामी झाली.गत वैभव मिळालेल्या हुतात्मा स्मारकाला राजकारणी नेत्यांनी पोखरून घेतले आहे. आता उरल्या सुरल्या पुस्तकांचा अभ्यास मुले करीत आहेत. पण,जे या स्मारकाला चांगले दिवस आले होते.राजकारणाचा अती हस्तक्षेप झाल्याने पुन्हा वाईट दिवसाकडे हुतात्मा स्मारकाचा प्रवास सुरु झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे.या लढयात भंडारा जिल्ह्यातील काही लोकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांती लढयाची आठवण म्हणून ९ आॅगस्टला ‘क्रांती दिन’पाळला जातो; परंतु आज या दिवसाचे महत्त्व नवीन पिढीलाच नाही तर नेते- पुढाºयांनाही राहिलेले नाही, हे आपले दुर्दैव आहे. ग्रामीण विदर्भातील सवार्धीक खपाचे मराठी दैनिक भंडारा पत्रिकाच्या वतीने भारतीय आॅगस्ट क्रांतीदिवसनिमित्त विन्रम अभिवादन!

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *