८ दोषींना निलंबित करुन कठोर कारवाई करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शासकीय आयट- ीआय तुमसर येथील योगेश दिनेश नगरकर, शिल्प निदेशक विजतंत्री या पदावर कार्यरत होते. यांनी दि. ५ सप्टेंबर २०२३ रोजी नागपुर येथील आपल्या राहत्या घरी प्राचार्य एन. डी. पिसे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. मृतकच्या परिवारातील सदस्यांनी नागपुर येथे दाखल केलेल्या पोलिस तक्रारीत आपल्या आर्थिक, मानसिक व शारिरीक तसेच कौटुंबिक अडचणी लेखी स्वरुपात मांडल्या होत्या. त्या बाबतच्या पाठ पुरावा प्रादेशिक कार्यालय नागपुर सहसंचालक देवतळे यांच्या कार्यालयात केला होता.

परंतू त्यावर कसल्याच प्रकारची कार्यवाही न करता मृतकला यातना सोसाव्या लागल्या. चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणुन पिडीत परिवाराला योग्य न्याय मिळवून हि अपेक्षा बाळगुन राजमुद्रा ग्रुप तुमसर तर्फे निवेदन सादर करीत दोषी प्राचार्य नागपुर सह संचालक तसेच संस्थेतील निदेशक पंचबुध्दे यांच्यावर परिस्थीती वेळी जनने पुराव्याचा आधार घेवुन त्यांना सेवेतून बळतर्फ करुन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाहीकरावी, अशी मागणी राजमुद्रा ग्रुप संस्थापक/अध्यक्ष इंजी.सागर गभने यांनी पी.एम.वाकळे मार्फत संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई कडे केली आहे. सदर निवेदनातुन पुर्वसुचना करण्यात आली आहे की, पिडीत परिवाराला निवेदनाचा विषया अनुरूप १५ दिवसाच्या आत न्याय न मिळाल्यास तिव्र आंदोलन केले जाईल. ज्यातुन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थीती त्याची सर्वस्वी जबाबदारी संचालनालयाची राहील असे नमुद केले आहे. यावेळी मृतक शिक्षकाचे भाऊ नीलेश नागरकर, मीराताई भट, शुभम बाणासुरे, राहुल रणदिवे, नितेश कांबळे, संकेत गजभीये, अर्पित खाणोरकर उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *