विदर्भात ९ महिन्यांत १५८४ शेतकºयांच्या आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी यवतमाळ : गेल्या ४८ तासांत यवतमाळ जिल्ह्यात बंजारा, आदीवासी व दलीत समाजातील पाच कर्जबाजारी शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पोळा, गणेशोत्सव, गौरीपूजन आदी ग्रामीण सण आले की, शेतकरी आत्महत्यांनी समाजमन ढवळून निघते, त्याची पुनरावृत्ती यावर्षीही होत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात प्रवीण काळे (हिवरी), त्र्यंबक केराम (खडकी), मारोती चव्हाण (शिवणी), गजानन शिंगणे (अजुर्ना) आणि तेवीचंद राठोड (बाणगाव) या शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या नऊ महिन्यांत विदर्भात एक हजार ५८४ विक्रमी शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या असून या आत्महत्यांना केंद्र व राज्य सरकारचे चुकीचे धोरणच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा)चे राष्ट्रीय प्रवक्ते व महाराष्ट्राच्या स्व. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे. शेतकरी आत्महत्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढे आणणारे शेतकरी कार्यकर्ते किशोर तिवारी म्हणाले, चालू वर्षात विदर्भात विविध संकटामुळे एक हजार ५८४ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या २५ वर्षांतील ही विक्रमी संख्या असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

गेल्या वर्षीच्या कापूस, सोयाबीनच्या मंदीमुळे तसेच प्रचंड नापिकीमुळे शेतकºयांवर आर्थिक संकट आले आहे. लागवडीचा खर्च अतिशय वाढल्यामुळे व बँकांनी अपुरे पीककर्ज वाटप केल्यामुळे या आत्महत्या होत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. कमी मागणी असलेल्या कापूस या मुख्य नगदी पिकामुळे विदर्भाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. लागवडीचा खर्च वाढला, तर बँकांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अत्यंत कमी पीककजार्मुळे संकटात भर पडली आहे. शाश्वत पीक, अन्न डाळी आणि तेलबिया पिकांना प्रोत्साहन देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. जागतिक हवामानातील बदल हे सुद्धा सध्याच्या कृषी संकटाचे कारण आहेत, असे किशोर तिवारी म्हणाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *