ढिवर समाजाचे नेते असण्याचा बहुमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच जातो- केवट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यातील ढिवर समाजाचे नेते असण्याचा बहुमान कुणाला जात असेल तर तो फक्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच जातोय, असे प्रतिपादन मनोज केवट यांनी केले. अखिल ढिवर समाज विकास समिती, लाखनीच्या वतीने दि. १ आॅॅक्टोबर २०२३ रोज रविवारी बडगे सेलिब्रेशन सभागृह, लाखनी येथे आयोजित समाज प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मनोज केवट पुढे म्हणाले, लाखनी तालुक्यातील जीवतू मंगरु मांढरे यांचे घराची भिंत कोसळून मृत्यू झाला, ही दुर्दैवी गोष्ट आहे. यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेंतर्गत जिल्ह्यांतून हजारोंच्या संख्येने अर्ज करण्यात आले, हे कशाचे संकेत आहेत? यावरूनच हा समाज आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहे, हे स्पष्ट झाले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या “द अनटचेबल” या ग्रंथात भंडारा जिल्ह्यातील ढिवर समाज दलित असल्याचे नमूद केले आहे. अनुसूचित जाती व जमातीतील समाजबांधवांच्या अन्याय व अत्याचाराच्या घटनांची मालिका संपत नाही, तर अनुसूचित जातीच्या बाहेर असणाºया ढिवर समाजावर होणाºया अन्यायाची किंमत किती असेल, असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा. जनार्दन नागपुरे हे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून अखिल ढिवर समाज विकास समितीचे अध्यक्ष मनोज केवट, सचिव गोविंद मखरे, लाखनी तालुका कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष विष्णू चाचेरे, दूधपचारे सर, मार्गदर्शक मन्साराम मांढरे, दिगंबर चाचेरे लाखांदूर तालुका, बालकृष्णजी कुंभले अध्यक्ष लाखांदूर, राजेंद्र दिघोरे, रमेश प्रचारे, श्रीकृष्ण मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते दिनेश वासनिक, इत्यादींच्या उपस्थितीत प्रबोधन पर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात तालुका कार्यकारणी गठित करण्यात आली व त्यात तालुका अध्यक्ष मणिराम नान्हे, उपाध्यक्ष शिव- शंकर मांढरे, सचिव चंद्रभान मांडरे, सहसचिव विठ्ठल दिघोरे, कोषाध्यक्ष विनोद चाचेरे, सह कोषाध्यक्ष श्रीमती मीराबाई चाचरे व संचालक मंडळात आशिष दिघोरे, अनमोल मेश्राम, वामन दिघोरे, रुपेश दिघोरे, इ. ची निवड करण्यात आली. कार्यक्रमाला गुरुदेव शेंडे, अशोक कांबळे, पद्माकर मांढरे, यशवंत मांढरे, विलास चाचेरे, छगन मांढरे, टोलीराम पोहनकर, अनिल मांढरे, रवि मांढरे इ. नी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वर वलथरे यांनी केले तर आभार विष्णू चाचेरे यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *