सरपंच गीताताई आंबेडारे पायउतार, सोहनलाल पारधी यांच्याकडे प्रभारी सरपंचाचा पदभार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : पंचायत समिती तुमसर अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत सुकळी नकुल येथील सरपंच गीता ताई आंबेडारे अविश्वास प्रस्तावात पायउतार झाल्यामुळे उपसरपंच सोहनलाल पारधी यांनी प्रभारी सरपंच म्हणून पदभार सांभाळला असल्याचे वृत्त पंचायत समिती तुमसरचे खंड विकास अधिकारी यांनी १८ आॅक्टोबर रोजी दिलेल्या पत्रान्वये बहाल केल्याचे समजते. सरपंच गीताताई आंबेडारे यांचे विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव ग्रामपंचायत अधिनियम कलम ३५ (३ अ) नुसार पारित झाल्यानंतर सरपंच आंबेडारे यांनी कलम ३५ (२ ब )नुसार मुदतीचे आत जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडे अपिल केल्याचे दिसून आले नाही.सरपंच पद हे रिक्त असल्यामुळे या पदावर उपसरपंच सोहनलाल पारधी यांना ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे अधिनियम (३) कलम ३८ मधील २(क)नुसार सरपंच पदाचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे . सोहनलाल पारधी यांना सरपंच पदाचा अधिकार प्रदान करण्यात आल्या बाबद सचिवांना पत्र देऊन माहितीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा, तहसीलदार तुमसर , सरपंच गिताबाई आंबेडारे व प्रभारी सरपंच म्हणून सरपंच पद बहाल करण्यात आल्या बाबतचे पत्र सोहनलाल पारधी यांना सुद्धा देण्यात आले आहे

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.