चार लाख खर्चुन चार थेंब पाणी नाही

रवी धोतरे/भंडारा पत्रिका लाखनी : नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हर घर जल हर घर नल अशी केंद्र व राज्य शासनाची योजना मोठ्या प्रमाणात गावोगावी राबविण्यात येत आहे. तालुक्यातील सोमलवाडा या गावांमध्ये दोन पाण्याच्या टाक्या अस्तित्वात असतानाही तिसºया पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे.सदर बांधकाम जल जीवन मिशन नावाच्या योजनेखाली असून फक्त मेंढा या गावाकरीता ५० लाखाची योजना मंजूर करण्यात आली आहे . या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची चर्चा असून या प्रकरणाची चौकशी झाल्यास मोठा घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोमलवाडा ग्रामपंचायत मध्ये पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत गावाकरिता बोरवेल खोदणे आणि विद्युत मोटर पंप बसविण्याच्या कामाकरीता ४ लक्ष च्या वर खर्च करण्यात आले असले तरी अजून पर्यंत ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळाले नसल्याने ग्रामवासियांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामवासियांना नागरी मूलभूत सुविधा पुरविताना वेगवेगळ्या विकास कामाच्या नावावर सरपंच आणि सचिव यांनी परस्पर लाखो रुपयांची उचल करून गैरव्यवहार केल्याची चर्चा नागरिकातआहे.

जलजीवन प्राधिकरण आणि जे जे एम या विभागाच्या माध्यमातून गावातील नागरिकांना प्रति व्यक्ती ५४ लिटर पाणी मिळावे ही केंद्रशासनाची व राज्यशास्त्राची योजना असली तरी या योजनेला मुठमाती घालण्याचे काम येथील सरपंच आणि सचिव हे करीत असल्याने या पाणीपुर- वठ्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे चित्र आहे. भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी सोमलवाडा ग्रामपंचायत मध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी केल्यास मोठा धबाड बाहेर येण्याची शक्यता नाका- रता येत नाही.सोमलवाडा येथील नागरिकांना मिळणाºया मूलभूत नागरी सुख सुविधे पासून कसे वंचित ठेवण्यात येईल याचा विचार फक्त सरपंच आणि सचीव करीत आहेत. सोमलवाडा मेंढा ग्रामपंचायत अंतर्गत बिरसा मुंडा सौंदर्यीकरणाच्याकामात ,ग्रामपंचायत समोरील गट्टू बांधकाम या दोन्ही प्रकरणाची चौकशी झाल्यास गट्टू लावण्याच्या कामाची गुणवत्ता तसेच ईतर साहित्य खरेदीत केलेला गैरव्यवहार उघडकीस येईल.

सरपंच आणि सचिव यांनी मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत च्या खात्यावर जमा असलेल्या निधीची परस्पर दिले वाट लावल्यची नागरिकांत चर्चा आहे . गट्टू खरेदी व बोगस मजुरी यामध्ये मोठी तफावत असुन माननीय जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी अशी मागणी ग्रामवासीयांनी केली आहे . या बांधकामांमधील बिल क्रमांक २४३ ग्रामपंचायत सोमलवाडा च्या नावाने बिना तारखेच्या असून दोन लाख ९५ हजार साहित्यावर खर्च झाल्याची नोंद आहे. केंद्र व राज्य शासनाचा निधी सरपंच व सचिव मिळून जर स्वत:कडे दिवाळीच्या तोंडावर स्वत: करता हस्तगत करत असतील तर या प्रकरणाची अंकेक्षण विभागाकडून चौकशी झाल्यास सरपंच व सचिव यांनी धनादेशवर स्वत:च्या स्वाक्षरी करून लाखोंची रक्कम उचल केल्याची माहिती असून सरपंच व सचिव यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम कलमा नूसार कारवाई करण्याची मागणी सोमलवाडा ग्रामवासीयांनी जिल्हाधिकाºयाकडे केली असल्याची माहिती आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *