सोट जन सारख होणार पकरण अत्यत गभीर!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील कुख्यात बुकी सोंटू जैन प्रकरण गेल्या तीन महिन्या पासून गाजत आहे. यापूर्वी सोंटू जैन यांच्या घरची नागपुर पोलिसांनी झडती घेतली असता १७ कोटी नगद,१२.५०० किलो सोने आणि ३०० किलो चांदी जप्त करण्यात आली होती, त्या नंतर पोलिसांनी तपासणी केली असता पुन्हा सोंटू जैन यांच्या अ‍ॅक्सिस बँकेच्या लॉकरमधून मोठ्या प्रमाणात सोने आणि नगदी ही जप्त करण्यात आली त्याला नंतर आणखी तपासणी केली असतात त्याध्ये आणखी आरोपी मध्ये वाढ झाली असून या मध्ये गोंदिया येथील डॉ. बग्गा व अ‍ॅक्सिस बँकेचा मॅनेजर यांच्या कडून सुद्धा नगद ७० लाख रुपये रोख आणि दोन किलो सोने हे जप्त करण्यात आले असल्याने या प्रकरणात आणखी लोकांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे.

मात्र यावर जिल्ह्यातील कुणी ही राजकारणी काहीही बोलण्यास नकार देत असताना खा. प्रफुल पटेल यांना या संबंधित प्रश्न माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की गोंदिया जिल्ह्यात घडलेले सोंटू जैन सारखे प्रकरण घडले ही अत्यंत गंभीर बाब आहे. आणि ज्या पद्धतीनं जेवढा मोठा याचा व्याप केलेला आहे हे नक्कीच यामध्ये गांभीयार्ने दखल घेण्या सारखे आहे. अश्या प्रकारावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे असे ठाम मत खा. प्रफुल पटेल यांनी म्हटले. खा. पटेल म्हणाले की माज्या जिल्ह्याचा प्रकरण असल्यामुळे मी या प्रकरणाची माहिती मिळवली त्यात मला मिळालेल्या माहिती प्रमाणे यात ज्यांचा यांच्याशी तिळमात्र ही संबंध नाही असे लोक ही यात चौकशी पथकाकडून गुंतवले गेलेले आहेत.

सुमारे ५००६०० लोकांना चौकशी करिता पाचारण केले गेले आहे. माझं असं मत आहे की यात इतके लोक सहभागी नसतीलच पण जे कुणी यात सहभागी किंवा गुंतलेले असतील. मोठ्या आर्थिक लाभा पोटी कळत नकळत सहभागी झालेले असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे या मताचा मी आहे. एकंदरीत माज्या माहितीप्रमाणे आॅनलाईन गेमिंग याचे दोन प्रकार आहेत. एक यात कौशल्य आधारित गेमिंग असते याचा विरोध करण्याचा कोणताही कारण नाही. पण दुसरा प्रकार हा आॅनलाईन गेमिंग मधला सरळ सरळ जुगाराशीच संबंधित आहे. नक्कीच यावर आळा घालणे गरजेचे आहे. खासकरून आजच्या काळात तरुण मंडळी ज्यांच्या हातात स्मार्ट फोन (मोबाईल) आहे हे या जुगाराकडे एक आकर्षण म्हणून वळत आहेत. काहींना तर याची सवयच झालेली असते. यूपीआय च्या माध्यमातून पेमेंट होतात. यामुळे आॅनलाईन गेमिंग मधील चुकीचे प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढतच गेलेले आहेत. याला नक्कीच तत्काळ आवरण्याची गरज आज निर्माण झालेली असल्याचेही या प्रसंगी खा. प्रफुल पटेल आवर्जून म्हणाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *