आमदार रणजीत कांबळे पुन्हा वादात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वर्धा: विविध वाद ओढवून घेणारे आमदार म्हणून चर्चेत राहणारे रणजीत कांबळे यांच्या विरोधात आता आणखी गुन्हे दाखल झाले आहे. यापूर्वी आरोग्य अधिकाºयास शिवीगाळ केल्याची ध्वनिफीत व्हायरल झाल्याने त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते. आता सोनेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य गणेश सातव यांनी त्यांना आ. कांबळे यांनी मारहाण केल्याची तक्रार केली होती. पण हे प्रकरण गुन्हे दाखल न करता चौकशीस ठेवण्यात आले होते. त्याची दखल घेत खासदार रामदास तडस व अन्य भाजप नेत्यांनी गुन्हा दाखल करा अन्यथा पोलीस ठाण्यास घेराव घालू, असा इशारा देवून टाकला होता. याचे निवेदन पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनाही देण्यात आले होते. अखेर तीन कलमाखाली कांबळे विरोधात गुन्हे दाखल केल्याचे देवळी पोलीसांनी सांगितले.

भाजपच्या खासदार निधीतून होणाºया कामात डावलले जात असल्याची तक्रार सातत्याने होत होती. भूमिपूजन होत होते, पण काम मार्गी लागत नव्हते. त्याचा जाब विचारला म्हणून मारहाण झाली, अशी तक्रार भाजप नेत्यांनी केली. त्याची अखेर पोलीसांनी नोंद घेतली आहे. भाजपचे देवळी विधानसभा क्षेत्र प्रमुख राजेश बकाणे म्हणाले की केंद्र पुरस्कृत निधीतून होणाºया कामाचे भूमिपूजन करण्याचा अधिकार खासदारांचा आहे. अन्य कामे पण पालकमंत्री निर्देश दिल्यावर होतात. पण हे संकेत न पाळता स्वत:च्या नावाने फलक लावण्याची दादागिरी चालली होती. त्याचा खुलासा मागणाºया स्थानिक पुढारी व लोकप्रतिनिधींना मारहाण केली जायची. हे थांबले पाहिजे म्हणून आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.