‘त्या’ खून प्रकरणी आणखी एका आरोपीस अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- सख्ख्या मोठया भावानेच धाकट्या भावाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना लाखनी तालुक्यातील सावरी/मुरमाडी येथे सोमवारी (ता.१३) ला रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. सततच्या भांडणामुळे थोरल्या भावाने धाकट्या भावाचा खून इतर साथीदारांच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून त्या खून प्रकरणी आणखी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव कार्तिक शरद मांढरे वय ३० वर्ष रा. सावरी असे आहे. आता आरोपींची संख्या ३ झाली असून मुख्य आरोपी राहुल रामचंद्र भोयर ३३वर्षे रा. सावरी, ता. लाखनी, शुभम मारोती न्यायमूर्ते (वय अंदाजे २८वर्षे, रा. नागपूर व कार्तिक शरद मांढरे वय ३० रां.सावरी अशी आरोपींची नावे आहेत. सावरी जवळील खेडेपार रोडलगत ५० फुटअंतरावर एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असल्याची माहितीगावातीलच रहिवाशी मंगेश टिचकुले यांनी रात्री ११ वाजून ३० वाजता फोनकरून लाखनी पोलिसांना दिली होती. सावरीखेडेपार रस्त्यावर मृतकाच्या रक्ताचा सडा पडलेला होता. घटनास्थळी श्वान पथक व फॉरेन्सिक चमू यांना पाचारण करण्यात आले होते.

याप्रकरणी लाखनी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मोठा भाऊ राहुल भोयर याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले व कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने नागपूर येथील शुभम मारोती न्यायमुर्ते व कार्तिक मांढरे यांच्या मदतीने खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांना २ आरोपी पकडण्यात घटना घडण्याच्या दिवशीच यश आले तर कार्तिक मांढरे याला उशिरापर्यंत सावरी/ लाखनी येथून अटक केली आहे. लाखनी पोलिस ठाण्यात अपराध क्र. ३७५/२०२३ कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या खुनाचा तपास पोलीस निरीक्षक सत्यविर बंडीवार करीत आहेत. आज बुधवारी (ता. १५) ला तिन्ही आरोपींना प्रथम श्रेणी दिवाणी व फौजदारी न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने कार्तिक मांढरे याला १७ नोव्हेंबर पर्यंत तर मुख्य आरोपी राहुल भोयर व शुभम न्यायमूर्ती यांना १९ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *