७ डिसेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून सुरू होत असल्याने विधानभवन परिसरात जय्यत तयारीला वेग आला आहे. अधिवेशनाला आता केवळ १४ दिवस शिल्लक असल्याने विधानभवन, रवीभवन, आमदार निवास, नागभवन व इतर इमारतीची दुरुस्तीसह रंगरंगोटीचे अतिरिक्त कर्मचाºयांच्या मदतीने पूर्ण केल्या जात आहे. विधिमंडळाच्या आत आणि बाहेरील कक्षातील फर्नीचर स्वच्छ केल्या जात आहे. पहिल्यांदाच तात्पुरते प्रतीक्षालय मुख्यत: अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, प्रशासकीय अधिका- री, मंत्र्यांचे स्वीय सहायक विधानभवनात आल्यानंतर प्रतिक्षा करण्यासाठी पहिल्यांदाच तात्पुरते प्रतीक्षालय बांधण्यात येत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विधीमंडळ सभागृहाच्या बाहेर प्रतीक्षालय तयार झाल्यास ताटकळत उभे राहण्याची गरज राहणार नाही. विधानभवनातील मुख्य मार्गावरील खाद्य पदार्थांचे स्टॉल्स यंदा मागच्या भागात राहणार आहे. हा रस्ता मोकळा ठेवण्यात येणार आहे. रविभवनात सर्वाधिक वर्दळ हिवाळी अधिवेशनासाठी येणाºया मंत्र्यांच्या निवासाची व्यवस्था रविभवनात असल्याने हा संपूर्ण परिसर स्वच्छ व सुंदर केल्या जात आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान सर्वाधिक वर्दळ रविभवन परिसरात होत असते. त्यामुळे येथे सीसीटीव्ही लावल्या जात आहे. रवीभवन येथे कॅबिनेट मंत्र्यांशिवाय सचिव दर्जाचे अधिकारी राहतात त्यामुळे अधिक सुरक्षा व्यवस्था केल्या जात आहे. विधानभवनातील सर्व कर्मचारी २७ नोव्हेंबरला येत आहे. त्यापूर्वी विधानभवनातील कक्ष तयार करण्यासाठी कर्मचाºयांची धावपळ दिसून येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *