अंगणवाडी सेविकाचे आंदोलनस्थळी ओम पटले यांची भेट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : महाराष्ट्र अंगणवाडी सेविका कर्मचारी संघटनेचे अंगणवाडी सेविका, मदतनीस चे तिरोड़ा प्रकल्प कार्यालयासमोरील आंदोलन स्थळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ओम पटले यांनी भेट देऊन त्यांचे मागण्यासंबंधी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे मार्फत हिवाळी अधिवेशनात ठेवण्याचे आश्वासन दिले.

४ डिसेंबर पासून अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपले विविध मागण्यांचे संबंधी आंदोलन पुकारले असून या आंदोलन स्थळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ओम पटले यांनी आज दिनांक ७ डिसेंबर रोजी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या रास्त मागण्या माजी तालुका काँग्रेस अध्यक्ष राधेलालजी पटले, गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप बनसोड यांचे मार्फत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे समोर मांडून त्यांच्याकडून नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात या मागण्या मांडून सोडवण्याकरता प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी अंगणवाडी सेविका मदतनीस संघटनेच्या मंगला तिडके, शकुंतला फटिंग, ललीता रोडगे, शिला बांते, ममता राहंगडाले, ललिता पटले, जीवनकला वैद्य, सुमन झंझाड, अल्का राउत, दुर्गा संतापे, किरण ठवरे, लक्ष्मी तुमसरे, प्रमिला ठाकरे, निर्मला भांडारकर उपस्थित होत्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *